शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

वसमतमध्ये नगरसेवकांचे उपोषण

By admin | Published: June 20, 2014 11:51 PM

वसमत : शहरात स्वच्छता करण्यात नगरपालिका प्रशासन स्पेशल अपयश ठरल्याने व चोहीकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे.

वसमत : शहरात स्वच्छता करण्यात नगरपालिका प्रशासन स्पेशल अपयश ठरल्याने व चोहीकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे. शहर स्वच्छ करा या मागणीसाठी आज नगरपालिकेसमोर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या सदस्यांनी उपोषण करून आक्रमक पवित्रा घेतला या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व्यापारी व नागरिकही उपस्थित होते.शहराच्या मुख्य बाजारपेठेतून पायी चालणेही अवघड झाले आहे. गटाराचे पाणी दररोज सकाळी १० वाजेपर्यंत रस्त्यावरून वाहते. त्यामुळे पादचाऱ्यांना अक्षरश: दुकानांच्या ओट्यावरून ये-जा करावी लागते. एवढी बिकटअवस्था बाजारपेठेत आहे. शहरात इतरत्रही कचऱ्यांचे ढिगारे, घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक वैतागले आहेत. या प्रकाराकडे सत्ताधारी व नगर प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने आघाडीच्या सदस्यांनी या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व्यापारी, नागरिक व विविध पक्षांचे पदाधिकारीही उपोषणार्थींची समजूत घालण्यासाठी नगराध्यक्षांचे पती शिवदास बोड्डेवार, शिवसेना गटनेते सुनील काळे, उपमुख्याधिकारी मुजीब खान, नगर अभियंता रत्नाकर अडसीरे व अन्य अधिकारी, कर्मचारी हजर झाले.दोन तासांच्या प्रदीर्घ आरोप- प्रत्यारोपानंतर नगरपालिकेत लेखी आश्वासन देवून १ तारखेपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने ४ वाजता उपोषण आटोपले. उपोषणात राष्ट्रवादीचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष शशिकुमार कुल्थे, खलील अहेमद, राजकुमार एंगडे, अ. अरशद अ. खादर, अफसर लड्डा, बालाजी कट्टेकर, राहुल उबारे, दत्तात्रय बोबडे, भास्कर गवळी, बालाजी जांभळे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.शहरातील स्वच्छतेचा प्रश्न विरोधकांनी उचलून धरल्याने नागरिकांनीही उपोषणाला व मागणीला पाठिंबा दिला. नगरपालिकेच्या कारभारावर व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नसल्यानेच शहराच्या स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून शहर गेल्या पंचवीस वर्षांत सर्वाधिक बकाल व अस्वच्छतेचा कहर झाल्याचे आरोप उपोषणार्थींनी केले. (वार्ताहर)