शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

धक्कादायक ! औरंगाबादेत प्रसूतीनंतर बाधीत मातेचा मृत्यू; बाळ सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:08 IST

औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या अठराशे पार

औरंगाबाद : शहरातील नेहरू नगर येथील ३० वर्षीय बाधीत प्रसूत महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चार जून रोजी घडली. जिल्ह्यातील हा सर्वात कमी वयाचा मृत्यू ठरला असून एकूण ९३ कोरोनाबाधितांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, बाळ सुखरूप असून त्याचा पहिला स्वॅब निगेटिव्ह आला असून दुसऱ्या स्वॅबच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे,अशी माहिती डॉ अरविंद गायकवाड यांनी दिली.

नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या ३० वर्षीय गर्भवती महिलेला २८ मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रसूतीनंतर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मूत्रपिंड निकामी झाल्याने महिलेला पाच वेळेस डायलेसिस देण्यात आले होते. शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होत असल्याने कृत्रिम श्वास देण्यात आला होता. त्यानंतर औषधोपचाराला शरीराने साथ न दिल्याने या बाधित मातेचा चार जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू झाला, असे डॉ अरविंद गायकवाड यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णसंख्या अठराशे पारदरम्यान, जिल्ह्यात ५९ बाधितांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८२८ झाली आहे. यापैकी ११३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.तर ६०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतमाता नगर १, इंदिरानगर न्यू बायजीपुरा १, न्यू कॉलनी, रोशन गेट १, भावसिंगपुरा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, बेगमपुरा १, चिश्तिया कॉलनी १, फाझलपुरा १, रेहमानिया कॉलनी १, गांधी नगर १, युनूस कॉलनी २, जुना मोंढा, भवानी नगर १, शुभश्री कॉलनी, एन सहा १, संत ज्ञानेश्वर नगर, एन ९ येथील १, आयोध्या नगर, एन सात ७, बुडीलेन ३, मयूर नगर, एन अकरा १, विजय नगर, गारखेडा ३ सईदा कॉलनी १, गणेश कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजलपुरा १, रोशन गेट परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, औरंगपुरा २, एन आठ सिडको १, समता नगर ४, ‍मिल कॉर्नर २, जवाहर कॉलनी ३, मोगलपुरा २, जुना मोंढा १, नॅशनल कॉलनी १, राम मंदिर, बारी कॉलनी १, विद्यानिकेतन कॉलनी १, देवडी बाजार १, एन सात सिडको १, एन बारा १, आझाद चौक १, टी.व्ही. सेंटर एन अकरा १, कैलास नगर १, अन्य १ असे १९ महिला आणि ४० पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू