ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयातुन झाली सहा रुग्णांची सुटी
औरंगाबाद : शहरातील आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सोमवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. रविवारीसुद्धा शहरातील पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}शहरातील विविध भागातून आतापर्यंत ३१ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात काहीसे चिंतेचे वातावरण होते. मात्र रविवारी पाच आणि सोमवारी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे. सोमवारी दुपारी जिल्हा सामान्य रूग्णालयात या सहा रूग्णांचे महापौर नंदकुमार घोडले यांनी स्वागत केले. यानंतर या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.