coronavirus : मराठवाड्यात १,७४१ कोरोना बाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:53 IST2020-09-11T12:47:09+5:302020-09-11T12:53:08+5:30
गुरुवारी मराठवाड्यात २३ जणांचा मृत्यू झाला.

coronavirus : मराठवाड्यात १,७४१ कोरोना बाधितांची भर
औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी १ हजार ७४१ बाधितांची भर पडली असून २३ जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद जिल्ह्यात ४३७, लातूरमध्ये ३४७, नांदेडात ३२७, उस्मानाबादेत १८२, परभणीत १४0, जालन्यात १३३, बीडमध्ये ११0 व हिंगोलीत ६५ बाधित आढळले.
औरंगाबाद + 437
औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी ४३७ नव्या रुग्णांची भर पडली असून १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २७,२८९ झाली आहे. तसेच एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ७८२ झाली आहे.
लातूर + 347
लातूर : गुरुवारी जिल्ह्यात ३४७ रुग्णांची भर पडली.आता बाधितांचा आलेख ११ हजार ३३४ वर पोहोचला. ७ हजार ९३५ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३३९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
नांदेड + 327
नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी ३२७ बाधितांची भर पडली असून, तिघांचा मृत्यू झाला. आता बाधितांची संख्या १० हजार ३१३ झाली आहे. तसेच २८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी १२१ कोरोना बाधितांना सुट्टी देण्यात आली. ३ हजार ४८५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
उस्मानाबाद + 182
उस्मानाबाद : जिल्ह्यात गुरुवारी १८२ कोरोनाबाधितांचीभर पडली़ आता बाधितांची संख्या ७ हजार ८५६ झाली आहे. २२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ ५ हजार २३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. २ हजार ४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत़
परभणी + 140
परभणी : जिल्ह्यात गुरुवारी १४० बाधित आढळले असून, एकाचा मृत्यू झाला. आता बाधितांची संख्या ३ हजार ८७२ झाली. १५१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत २ हजार ७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जालना + 133
जालना : जिल्ह्यात गुरुवारी १३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला असून एकाचा मृत्यू झाला. आता बाधितांची संख्या ६ हजार १७० झाली असून १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ हजार ४१२ जणांनी कोरोनावर मात केली.
बीड + 110
बीड : गुरुवारी ११० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या ६ हजार २४ झाली आहे. यात बीड, अंबाजोगाई, माजलगावच्या रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १८१ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार २१५ जणांनी कोरोनावर मात केली
आहे.
हिंगोली + 65
हिंगोली : गुरुवारी जिल्ह्यात ६५ बाधित आढळले. आता बाधितांची संख्या १, ९00 झाली. आतापर्यंत २२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.