कोरोनाची भीती राजकीय प्रेरित; निवडणुका पुढे ढकलू नका : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 16:12 IST2020-03-13T15:51:07+5:302020-03-13T16:12:34+5:30
शासकीय यंत्रणा सुरु राहिली पाहिजे

कोरोनाची भीती राजकीय प्रेरित; निवडणुका पुढे ढकलू नका : प्रकाश आंबेडकर
औरंगाबाद : कोरोनाची भीती राजकीय आहे, त्याचा बाऊ करू नका. काहीही झाले तरी सरकारी व्यवस्था चालू राहावी. यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलू नका अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.
शहरातील भटके विमुक्त आदिवासी परिषदेच्या पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडून पडले आहे. यामुळे देशात सीएए, एनआरसी, एनपीआर याच्यावरून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
महापालिका निवडणुका वेळेवर घ्या
कोरोनाची भीती ही राजकीय प्रेरित आहे. यामुळे सरकारी व्यवस्थेला बाधा येऊ नये. सिस्टीम चाली पाहिजे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका वेळेवर घ्या अशी मागणीही आंबेडकर यांनी यावेळी केली.