शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

मका उत्पादक पुन्हा अडचणीत

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाअभावी मक्याचे पीक करपून गेले.

सुनील कच्छवे , औरंगाबादखरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे यंदा जिल्ह्यातील मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाअभावी मक्याचे पीक करपून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न १६ क्विंटलवरून ३ ते ४ क्विंटलवर आले आहे. अनेक शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्चही निघालेला नाही.अत्यल्प पावसामुळे यंदा औरंगाबाद जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. आॅगस्टनंतर जिल्ह्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे खरिपाच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात कापूस आणि मका ही खरिपाची प्रमुख पिके आहेत. यापैकी ४ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, तर १ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली होती. जून महिना कोरडा गेल्यामुळे दोन्ही पिकांची पेरणी महिनाभर उशिराने झाली होती. शिवाय आॅगस्टनंतर पुन्हा पावसाने पाठ फिरविली. मक्याची वाढ होण्याच्या काळात पाऊस नसल्याने या पिकाला जबरदस्त फटका बसला. हजारो हेक्टरवरील मक्याचे पीक पाण्याअभावी करपून गेले. जेथे थोडीफार वाढ झाली तेथेही मक्याची कणसे पुरेशी भरली नाहीत. त्यामुळे मका उत्पन्न ६० ते ७० टक्क्यांनी घटले आहे. जिल्ह्यातील मका उत्पादनाची सरासरी एकरी १६ क्विंटल आहे. मात्र, यंदा हे उत्पन्न ३ ते ४ क्विंटलवर आले आहे. परिणामी, जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. खर्च सहा हजार, उत्पन्न २,६०० रुपयेऔरंगाबाद तालुक्यातील फेरण जळगाव येथील शेतकरी अशोक हिवराळे यांनी दीड एकरात मका पिकाची लागवड केली होती. त्यासाठी बियाणासह खत, खुरपणी आदींसाठी एकूण सहा हजार रुपये खर्च केला होता. त्यांना या दीड एकरात अवघे तीन क्विंटल एवढेच उत्पन्न निघाले. त्यातून त्यांना केवळ २,६६५ रुपये मिळाले. झालेला खर्चही निघालेला नाही. फेबु्रवारीनंतर चाऱ्याचा प्रश्न भेडसावणारमका पिकाला फटका बसल्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसानच झालेले नाही, तर जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मका पिकाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा म्हणून मका पिकाकडे बघितले जाते; परंतु यंदा हजारो हेक्टरवरील मका पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात फेबु्रवारीनंतर चाराटंचाई भासेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.१मका उत्पादनासाठी औरंगाबाद जिल्हा आघाडीवर आहे. सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, औरंगाबादसह जिल्ह्यातील सर्व नऊही तालुक्यांत मक्याचे उत्पन्न घेतले जाते. २दरवर्षी जिल्ह्यात सरासरी ६० लाख क्विंटल मका उत्पादित केला जातो. यंदा उत्पन्न जवळपास ७० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे चारशे कोटी रुपयांचा फटका बसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.