शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांवरील अडीचशे मालमत्तांवर संक्रांत

By admin | Updated: August 11, 2015 00:52 IST

औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेच्या कामात नाल्यांवरील बांधकामांमुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अडथळ्यांमुळेच वर्षभरानंतरही योजनेचे

सचिन भोसले -कोल्हापूरच्या उद्योगनगरीचा पाया रचणाऱ्या शिवाजी उद्यमनगरला विशेष महत्त्व आहे. मात्र, खुद्द उद्यमनगर भागात मतदार कमी असल्याने हा प्रभाग नगरपालिका आणि पुढे महापालिका झाल्यानंतरही उपेक्षितच राहिला आहे. या प्रभागात अंतर्गत रस्ते आणि पाण्याची समस्या जणू येथील नागरिकांच्या पाचवीलाच पूजली आहे. मतदान कमी असल्याने सातत्याने उद्यमनगराबाहेरील उमेदवार निवडून आले. त्यामुळे या उद्यमनगरमध्ये आजही मूलभूत सुविधांची वानवाच आहे. शहरातील सर्व नगरांमध्ये आणि प्रभागांत अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते झाले आहेत. मात्र, या प्रभागातील आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ते स्टेट बँक आॅफ इंडियापर्यंतचा रस्ता गेली कित्येक वर्षे डांबरीकरण झालेला नाही. यंदा या प्रभागाचा समावेश आरक्षण सोडतीत नागरिकांचा मागास प्रवर्गात झाला आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी कुणबी दाखले काढत निवडणूक ‘अ‍ॅट अ‍ॅनी कॉस्ट’ लढवायचीच, असा चंग बांधला आहे. कोल्हापूर नगरपालिकेचे १९७२ मध्ये महापालिकेत रूपांतर झाले. त्यापूर्वी कौन्सिलर म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे नेते स्वर्गीय के. आर. अकोळकर यांनी काम पाहिले. ते स्वत: शाहूपुरी पाचवी गल्ली येथील कुंभार गल्लीत राहत होते. त्या भागातील काही भाग या उद्यमनगर प्रभागात त्यावेळी येत होता. कुंभार गल्लीतील एकटाक मतदान त्यांना होत असल्याने ते सातत्याने या प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत होते. पुढे महापालिकेत रूपांतर झाल्यानंतरही त्यांनी चार टर्म नगरसेवक म्हणून याच प्रभागाचे नेतृत्व केले. १९९० च्या सुमारास या प्रभागाची रचना थोडी बदलण्यात आली. त्यामुळे या प्रभागात शिवसेनेतून नामदेव जाधव यांनी त्यांना चांगली लढत दिली; मात्र तरीही ते निवडून आले. कालांतराने या प्रभागात रविवार पेठ, उमा टॉकीज, राजारामपुरी मातंग वसाहत, यादवनगरचा काही भाग समाविष्ट करण्यात आला. युतीच्या शासन काळात रविवार पेठेतील व शिवसेनेच्या तिकिटावर कल्पना संकपाळ यांनी विजय मिळविला.पुढे रविवार पेठेवर दिलबहार तालमीचा पगडा मोठा असल्याने तालमीचे तत्कालीन अध्यक्ष रामभाऊ फाळके यांनी पुतण्या उदय फाळके यांना प्रभागातून उभे केले. यावेळी उदय फाळके यांनी अजित मोरे यांना लढत देत विजय मिळवला. फाळके यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने पुढे या प्रभागात अजित मोरे यांनी विनायक फाळके यांच्याविरोधात लढत देत प्रभागाचे प्रतिनिधित्व केले. कालांतराने हा प्रभाग २०१० च्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित झाला. यामध्ये माजी महापौर कांचन कवाळे यांच्या स्नुषा कादंबरी कवाळे या प्रभागातून निवडणुकीस उभ्या राहिल्या. त्यांच्याविरोधात राजकारणात नवख्या असलेल्या अमृता ठोमके यांचा टिकाव लागला नाही. पुढे कवाळे या सासू व सासऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत महापौर झाल्या, तरीही अनेक विकासकामे त्यांनी उद्यमनगर सोडून केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या प्रभागात विनायक फाळके विरुद्ध अजित मोरे यांच्यातच पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. विनायक फाळके सध्या विद्यमान स्वीकृत संचालक आहेत, तर अजित मोरे यांनी २००५ ते २०१० काळात महापालिका सभागृहात परिवहन समिती सभापतिपद भूषविले आहे. हा प्रभाग यंदाच्या आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्ग झाल्याने या प्रभागात हे दोन्ही उमेदवार ‘कुणबी’ या जातीच्या दाखल्यावर उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. विनायक फाळके यांनी कुणबी जातीचा दाखला काढल्याचेही समजते, तर अजित मोरे यांनी पत्नी मंजिरी देसाई-मोरे यांच्या नावे अर्ज भरण्याची तयारी केली आहे. त्यांचाही कुणबी जातीचा दाखला काढल्याचे समजते. या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धांशिवाय प्रभाग क्रमांक ३३ मधील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील हेही या प्रभागातून नशीब अजमावणार आहेत. त्यांचा प्रभाग हा सर्वसाधारण महिला प्रवर्ग झाला आहे. याशिवाय त्यांच्या पूर्वीच्या प्रभागातील पाटाकडील तालीम, भारत डेअरी, साठमारी, रविवार पेठ आदी भाग प्रभाग क्रमांक ३४ उद्यमनगरमध्ये नव्याने समाविष्ट झाला आहे. या प्रभागातही आपले मतदार जादा असल्याने त्यांना निवडून येऊ, असा विश्वास आहे.याशिवाय खुद्द उद्यमनगरातून उद्योजक उदय दुधाणे, इंद्रजित ऊर्फ पप्पू दुधाणे, कपिल मगदूम व शिवसेना, भाजप यांचेही उमेदवार निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. ‘मनसे’चे शहर उपाध्यक्ष मनजित सराटे यांनी युवकांच्या माध्यमातून आपली मोट बांधली आहे. पूल गल्ली तालीम मंडळ येथे राहणारे सराटे हेही या मतदारसंघातून युवकांच्या जोरावर आपली ताकद अजमावणार आहे.आझाद चौक पूर्व बाजू, गणेश गल्ली दक्षिण बाजू, महालक्ष्मी गारमेंट, सनगर गल्ली, कापडी गल्ली, संत गल्ली, गजानन बेकर्स, गोखले कॉलेज, साठमारी, रावणेश्वर मंदिर, एअरटेल आॅफिस, केएमसी वर्कशॉप, फुले हॉस्पिटल, श्रीकांत रेस्टॉरंट, स्टेट बँक, शिवाजी उद्यमनगर, बिग बझार, बसू हॉटेल ते उमा टॉकीज ते आझाद चौक, जुना देवल क्लब, टेंबे रोड, दिलबहार तालीम, साई मंदिर, तांदळे पॅसेज, शिवाजी स्टेडियम, शाहू स्टेडियम, प्रायव्हेट हायस्कूल, भारत डेअरी, पीटीएम तालीम, बँक आॅफ महाराष्ट्र. विनायक फाळके हे दिलबहार तालीम मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून काम करीत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे युवावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. अजित मोरे यांचा कुणबी दाखला नसल्याने पूर्वीच्या कामाच्या शिदोरीवर आपल्या पत्नी व गोखले कॉलेजच्या प्रशासन अधिकारी प्रा. मंजिरी देसाई-मोरे यांच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. या दोन प्रतिस्पर्धांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील हेही आरक्षण बदलल्याने या प्रभागातून नशीब अजमावणार आहेत.