महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण, डाॅक्टर कधी देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:40 IST2025-06-09T20:39:17+5:302025-06-09T20:40:27+5:30

दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०० खाटांचे माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) साकारण्यात येत आहे.

Construction of Women and Newborn Hospital 95 percent complete, when will doctors be provided? | महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण, डाॅक्टर कधी देणार?

महिला व नवजात शिशू रुग्णालयाचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण, डाॅक्टर कधी देणार?

छत्रपती संभाजीनगर : दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि २०० खाटांचे ‘एमसीएच विंग’ काम सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. परंतु, अजूनही या ४०० खाटांच्या रुग्णालयासाठी डाॅक्टर, नर्ससह आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागणे बाकी आहे.

दूध डेअरी येथील जागेत २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालयाच्या चार मजली इमारतीचे बांधकाम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तर, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २०० खाटांचे माता व बालसंगोपन विभाग (एमसीएच विंग) साकारण्यात येत आहे. या ‘एमसीएच विंग’चे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आगामी ३ महिन्यांत उर्वरित काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. रुग्णालयाचे काम पूर्ण होत असताना पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णालय उभे राहिल्यानंतर डाॅक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांची प्रतीक्षेत रुग्णसेवेला विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३६० पदांची आवश्यकता
४०० खाटांच्या या रुग्णालयासाठी ३६० पदांची आवश्यक आहे. पदनिर्मितीच्या दृष्टीने या आठवड्यात मुंबईला बैठक होणार आहे. विशेष म्हणजे पूर्वी ‘एमसीएच विंग’साठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्याचे नियोजन होते. परंतु, आता येथेही कायमस्वरूपी पदे भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

४०० खाटांच्या दृष्टीने पदनिर्मिती
महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि ‘एमसीएच विंग’ या दोन्हींसाठी म्हणजे ४०० खाटांच्या दृष्टीने पदनिर्मितीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ‘एमसीएच विंग’साठी कंत्राटी नव्हे, तर कायमस्वरूपी पदे भरली जातील.
- डाॅ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Construction of Women and Newborn Hospital 95 percent complete, when will doctors be provided?