शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

विविध तंत्रज्ञानाचा एकत्रित विचार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:13 IST

औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक विद्याशाखांचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी विविध तंत्रज्ञानांचा स्वतंत्रपणे विचार न करता

औरंगाबाद : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अनेक विद्याशाखांचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी विविध तंत्रज्ञानांचा स्वतंत्रपणे विचार न करता एकत्रित (कनव्हर्जन) अभ्यास करावा. हीच बदलत्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी केले. नागसेनवन परिसरातील पीईएस तंत्रनिकेतन महाविद्यालयात ‘कनव्हर्जन आॅफ टेक्नॉलॉजी’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय परिसंवादाचे उद्घाटन डॉ. शिवणकर यांच्या हस्ते झाले. या परिसंवादात प्रमुख पाहुणे म्हणून ‘आयआयटी’ खरगपूरचे प्रा. सुशील संवत्सर, ‘आयआयटी’ मुंबईचे वरिष्ठ तंत्रसहायक, नोकियाचे प्रा. ए. पी. परांजपे, अभियंता संदीप दाभाडे आदींची उपस्थिती होती. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य टी. ए. कदम होते. या परिसंवादामध्ये राज्यभरातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे सुमारे ३५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. शिवणकर म्हणाले की, तंत्रज्ञानांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यापुढे सामाजिक व आर्थिक हित जोपासण्यासाठी विविध विद्याशाखांचा एकत्रित अभ्यास करणे हाच पर्याय असेल. या परिसंवादात ‘क्वॉलिटी इन एज्युकेशन, कम्युनिकेशन सिस्टीम अँड आॅप्टीकल नेटवर्क्स तसेच इंजिनिअरिंग अ‍ॅप्रोच’ या विषयावर विविध महाविद्यालयांतील सहभागी प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी संवाद साधला. या परिसंवादाचे कनव्हेनर म्हणून प्रा. सतीश सोनवणे, संयोजक समितीचे सचिव प्रा. शिल्पा गायकवाड, समन्वयक प्रा. किरणकुमार पैठणकर, प्रा. महेश आदोडे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. नेहा तिडके यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. नितीन साबणे यांनी मानले.