शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपातील गद्दारांना दिल्या कानपिचक्या

By admin | Updated: November 4, 2014 01:39 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदाच भाजपाने सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. बैठकीत कोअर कमिटीपुढे विरोधात काम करणाऱ्यांचा अहवाल देण्याचा निर्णय झाला. तसेच आगामी मनपा निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत नगरसेवकांची मते बैठकीत जाणून घेण्यात आली. केंद्रात, राज्यात सत्ता आल्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून, मनपा निवडणुकीतही पक्षाला नंबर वन करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात येणार आहे. मनपा निवडणुकीत प्रभाग पद्धतीऐवजी वॉर्डरचना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार आहे. उस्मानपुरा येथील विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला आ. अतुल सावे, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, पश्चिम मतदारसंघातून पराभूत झालेले मधुकर सावंत यांच्यासह पालिकेतील नगरसेवकांची उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाला जिल्ह्यात पाहिजे तसे यश मिळालेले नाही. फुलंब्री, औरंगाबाद पूर्व आणि गंगापूर मतदारसंघात पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र, उर्वरित सहा मतदारसंघांत थोड्याफार फरकाने पक्षाचे उमेदवार पडले. त्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन वाढविण्यासाठी आणि सदस्य नोंदणीवर भर देण्याचा निर्णय बैठकीत झाला. पश्चिम मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी उमेदवार सावंत यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप बैठकीत करण्यात आला. विधानसभेत ज्यांनी पक्ष उमेदवाराच्या विरोधात काम केले. त्यांचा सी.आर. खराब करून त्याचा अहवाल कोअर कमिटीला देऊ. अशा धमक्या शहराध्यक्ष भगवान घडामोडे यांनी दिल्या. ४यामुळे पक्षविरोधात काम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ज्या मतदारसंघात उमेदवार विजयी झालेत तेथील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी विचार केला जाणार आहे. आ. सावे म्हणाले...४सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. २० टक्के मतदारांची नोंदणी करून घेणे बाकी आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला फार अटीतटीचा सामना करावा लागला. मनपा निवडणुका आता समोर आहेत. ४पालिकेत यश मिळविण्यासाठी मेहनतीने काम करावे लागणार आहे. पक्षविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाईबाबत कोअर कमिटी निर्णय घेईल, असे आ. अतुल सावे यांनी सांगितले.