शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

By admin | Updated: February 2, 2016 00:26 IST

येणेगूर : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलने सर्वपक्षीय पॅनलचा धुव्वा उडवित १८ पैकी १४ जागांवर विजय मिळविला़

येणेगूर : उमरगा तालुक्यातील मुरूम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित पॅनलने सर्वपक्षीय पॅनलचा धुव्वा उडवित १८ पैकी १४ जागांवर विजय मिळविला़ तर ग्रामपंचायत गटातील चार जागांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत़ विरोधी पॅनला एकही जागा मिळाली नाही़१९६१ साली स्थापन झालेली मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षे कै़ महाधवराव पाटील यांच्या ताब्यात होती़ त्यानंतर औशाचे काँग्रेसचे आमदार बसवराज पाटीलही ही बाजार समिती वर्षानुवर्षापासून निर्विवाद आपल्या ताब्यात ठेवली आहे़ या निवडणुकीत काँग्रेस पॅनल विरूध्द सर्वपक्षीय पॅनल अशी लढत झाली़ युवा नेते शरण पाटील यांनी प्रचाराची धुरा हाती घेवून प्रचार यंत्रणा राबविली़ परिणामी १८ पैकी १४ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे़ तर ग्रामपंचायत गटाच्या चार जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे़ सोमवारी नगर परिषद सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही़ए़शिंदे, जाधव, आण्णाराव कुंभार आदीच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली़ यात सेवा संस्था मतदार संघातून काँग्रेसचे ११ उमेदवार, व्यापारी मतदार संघातून दोन, हमाल-मापाडी मतदार संघातून एक असे १४ उमेदवार विजयी झाले़ यात काँग्रेसचे बापूराव पाटील (२१९), बसवराज कारभारी (२०६), गोविंद पाटील (२११), बसवराज पाटील (२९२), धनराज जाधव (१९७), दगडू गायकवाड (१९८), महादेव टेंकाळे (२९२), श्रीदेवी बिराजदार (२२५), मंगलाबाई लामजणे (२१९), इतर मागास प्रवर्गातून सायबण्णा हिरमुखे (२२४), विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून विजयकुमार सोनकटाळे (२२४), व्यापारी गटातून विद्यमान नगराध्यक्ष धनराज मंगरुळे (१२४), आयुब मासूलदार (९८) तर हमाल मापाडी गटातून चंद्रकांत गायकवाड (७७) हे उमेदवार विजयी झाले़ ग्रामपंचायत गटातून चार जागांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे़ यात काही नवीन गावे या गटामध्ये जोडण्यात आल्याने निकाल लावण्यात आला नाही़ (वार्ताहर)