शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

योजनेबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 23:14 IST

पाटोदा : दारिद्रय रेषेखालील व बेघर कुटुम्बांना निवारा देण्याच्या हेतूने असणारी ‘आवास’ योजना बंद करण्यात आली आहे. नव्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजना घोषित करण्यात आली आहे;

पाटोदा : दारिद्रय रेषेखालील व बेघर कुटुम्बांना निवारा देण्याच्या हेतूने असणारी ‘आवास’ योजना बंद करण्यात आली आहे. नव्याने ‘प्रधानमंत्री आवास’ योजना घोषित करण्यात आली आहे; मात्र या योजनेसाठीचे नियम, अटींचे निर्देश पंचायत समिती स्तरापर्यंत अद्याप पोचले नसल्याने याबाबत संभ्रमावस्था आहे. जि प निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गटातटात वाद निर्माण होत आहेत .दारिद्र्यरेषेअंतर्गत व इतर बेघर कुटुंबांना स्वत:चे हक्कांचे छत देण्याचा भाग म्हणून इंदिरा आवास योजना, राजीव गांधी आवास योजना आणि रमाई आवास योजना अशा तीन योजना २०१५-१६ पर्यंत चालू आहेत. या योजना केंद्र सरकारच्या निधीमधून राबवल्या जातात. शासकीय पाहणी अहवालानुसार गुणानुक्रमानुसार प्राधान्य देण्यात आले. या पद्धतीने प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली .गावपातळीवर राजकारणदारिद्र्यरेषेअंतर्गत येणाऱ्या कुटुम्बांची प्रतीक्षा यादी संपुष्टात आलेली आहे . नवीन यादी तयार करण्याचे काम चालू आहे . अशा स्थितीत गावपातळीवरील पुढारी राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळी माहिती सांगून जि प निवडणुकीचा ‘तवा’ गरम ठेवला जातो आहे .घरकुलासंदर्भात आमच्याकडे स्पष्ट निर्देश आलेले नाहीत . त्यामुळे योजना कशी असेल याबाबत प्रशासन संभ्रमात आहे. सध्यातरी नवीन घरकुलासंदर्भात कुठलेही आदेश आले नसल्याचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर केकान म्हणाले. (वार्ताहर)