शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीची कामे तपासणीनंतरच पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:52 IST

पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: पाऊस कमी झाल्यामुळे येत्या काळातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी वाहून जाऊ नये यासाठी संबंधित यंत्रणांनी कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीचे कामे तांत्रिकदृष्ट्या तपासूनच पूर्ण करावीत, अशा सूचना पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिल्या़जलसंपदा लघूसिंचन, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे, नांदेड पाटबंधारे दक्षिण, उत्तर विभागाअंतर्गत कोल्हापुरी बंधाºयांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत खोतकर बोलत होते़ जिल्ह्यात आजघडीला १७६ कोल्हापुरी बंधारे असून त्यासाठी १२ हजार ४६५ दरवाजे आहेत़ त्यातील सध्या कार्यरत दरवाजांची संख्या ८ हजार ६७१ असून तब्बल ३ हजार ७९४ दरवाजे अद्यापही नादुरुस्त आहेत़ टंचाई आणि अतिवृष्टीमुळे नुकसान टाळण्यासाठी प्रकल्पाचे दरवाजे उघडता व बंद करता आली पाहिजेत़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या १८ क्रमांकाच्या दरवाजाची व कोल्हापुरी बंधाºयाच्या दरवाजा दुरुस्तीसाठी तांत्रिकदृष्ट्या तपासणी करावी़ प्रकल्पातील पाणी वाहून जाणार नाही, याबाबत दक्षता घेवून दुरुस्तीची कामे करावीत़ पुढील पाणीटंचाई लक्षात घेऊन कोल्हापुरी बंधाºयातील साठवलेले पाणी वाहून जाऊ नये यासाठी दक्ष रहावे़ दरवाजाची किरकोळ दुरुस्ती, नादुरुस्त दरवाजा, बांधकाम व इतर दुरुस्तीसाठी लागणारा निधी संबंधित विभाग किंवा आमदार निधीतून खर्च करण्यासाठी प्रयत्न करावा़ ज्या विभागाने कोल्हापुरी बंधारे बांधली त्यांनी बंधाºयांची देखभाल पूर्ण करावी़ यासाठी वेळेत दखल घेऊन यंत्रणांनी सतर्क रहावे़ यावेळी बैठकीला आ़ अमरनाथ राजूरकर, आ़हेमंत पाटील, आ़डी़पी़सावंत, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, आयुक्त गणेश देशमुख, अधीक्षक अभियंता एसक़े़सबीनवार उपस्थित होते़