शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई मोठी; पदरात केवळ अडीच कोटी !

By admin | Updated: February 1, 2015 00:39 IST

मोहनदास साखरे ,मांडवा दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. मात्र, २३ कोटींपैकी केवळ अडीच कोटींची मदत

मोहनदास साखरे ,मांडवा दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. मात्र, २३ कोटींपैकी केवळ अडीच कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. तलाठी कार्यालये, बँका, तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवत शेतकरी टाहो फोडत आहेत. मात्र, दुष्काळातही यंत्रणेचा कारभार ढिम्मच आहे. खुद्द पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याच तालुक्यात ही धक्कादायक स्थिती आहे, त्यामुळे इतर तालुक्यांचे न विचारलेलेच बरे !याद्याच पोहचल्या नाहीतपरळी तालुक्यासाठी एकूण १३ कोटी ३९ लाख ६२ हजार २१८ इतकी अनुदान रक्कम उपलब्ध झाली. पैकी केवळ १७ गावांमध्ये २ कोटी ५६ लाख ५४ हजार ४९५ इतकी मदत शेतकऱ्यांपुढे पोहचली. अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या क्रमांकांसह याद्या तहसील कार्यालयात जाणे अपेक्षित होते. मात्र, तलाठी याद्या शोधण्यातच मग्न आहेत. २९ तलाठी सज्जांवर १९ जण काम पाहत आहेत. त्यामुळे याद्या गोळा करण्याचे काम धिम्म्या गतीने सुरू आहे.२६ जानेवारीपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळणे अपेक्षित होते.४मात्र, पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच या सूचनेला अधिकाऱ्यांनी खोडा घातला.४२०६ गावांमधील ५६ हजार ९३२ शेतकऱ्यांपैकी केवळ ४ हजार ५२ जणांना भरपाई मिळाली. अद्यापही ५२ हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.शेतकऱ्यांच्या याद्या मागविणे सुरू आहे. हलगर्जी करणाऱ्या तलाठ्यांवर योग्य ती कारवाई करू. - सविता चौधर, उपविभागीय अधिकारी, परळी