भरपाई मोठी; पदरात केवळ अडीच कोटी !

By Admin | Updated: February 1, 2015 00:39 IST2015-02-01T00:39:37+5:302015-02-01T00:39:37+5:30

मोहनदास साखरे ,मांडवा दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. मात्र, २३ कोटींपैकी केवळ अडीच कोटींची मदत

Compensation is big; Only two and a half million! | भरपाई मोठी; पदरात केवळ अडीच कोटी !

भरपाई मोठी; पदरात केवळ अडीच कोटी !


मोहनदास साखरे ,मांडवा
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळण्यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. मात्र, २३ कोटींपैकी केवळ अडीच कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. तलाठी कार्यालये, बँका, तहसील कार्यालयांचे उंबरठे झिजवत शेतकरी टाहो फोडत आहेत. मात्र, दुष्काळातही यंत्रणेचा कारभार ढिम्मच आहे. खुद्द पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याच तालुक्यात ही धक्कादायक स्थिती आहे, त्यामुळे इतर तालुक्यांचे न विचारलेलेच बरे !
याद्याच पोहचल्या नाहीत
परळी तालुक्यासाठी एकूण १३ कोटी ३९ लाख ६२ हजार २१८ इतकी अनुदान रक्कम उपलब्ध झाली. पैकी केवळ १७ गावांमध्ये २ कोटी ५६ लाख ५४ हजार ४९५ इतकी मदत शेतकऱ्यांपुढे पोहचली. अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या क्रमांकांसह याद्या तहसील कार्यालयात जाणे अपेक्षित होते. मात्र, तलाठी याद्या शोधण्यातच मग्न आहेत. २९ तलाठी सज्जांवर १९ जण काम पाहत आहेत. त्यामुळे याद्या गोळा करण्याचे काम धिम्म्या गतीने सुरू आहे.
२६ जानेवारीपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळणे अपेक्षित होते.
४मात्र, पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच या सूचनेला अधिकाऱ्यांनी खोडा घातला.
४२०६ गावांमधील ५६ हजार ९३२ शेतकऱ्यांपैकी केवळ ४ हजार ५२ जणांना भरपाई मिळाली. अद्यापही ५२ हजारावर शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.
शेतकऱ्यांच्या याद्या मागविणे सुरू आहे. हलगर्जी करणाऱ्या तलाठ्यांवर योग्य ती कारवाई करू.
- सविता चौधर,
उपविभागीय अधिकारी, परळी

Web Title: Compensation is big; Only two and a half million!