शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘रुग्णाच्या नातेवाईकांसोबत संवाद आवश्यक’

By admin | Updated: September 22, 2014 01:11 IST

औरंगाबाद : अतिदक्षता कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात.

औरंगाबाद : अतिदक्षता कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात. रुग्णांवर करण्यात येत असलेले उपचार आणि त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत नातेवाईकांना दिली तर पुढील वाद टाळणे शक्य असते, असे प्रतिपादन आयसीयू तज्ज्ञ डॉ. शिवकुमार अय्यर यांनी केले.एमजीएममध्ये सुरू असलेल्या तीनदिवसीय महाक्रिटीकॉन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयसीयूमध्ये उपचार घेतल्यानंतर बरे झालेल्या दोन रुग्णांच्या हस्ते परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम.जाधव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉॅ. शिरीष प्रयाग, डॉ. अतुल कुलकर्णी, डॉ. आनंद निकाळजे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. डॉ. अय्यर म्हणाले की, अतिदक्षता विभागात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस प्रशिक्षित असल्या पाहिजेत. नातेवाईकांशी सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे. नातेवाईकांना उपचार पद्धतीची माहिती सांगितल्यास संभाव्य वादविवाद टळतात. डॉ. शिरीष प्रयाग म्हणाले की, रुग्णाला आपल्या गावात अथवा जवळच्या शहरात आयसीयूचे उपचार मिळाले तर गुंतागुंत होत नाही. महाक्रिटीकॉन परिषदेत लहान शहरातील डॉक्टर सहभागी झाले आहेत.तज्ज्ञांकडून सहभागी डॉक्टरांना सखोल मार्गदर्शन करणे, हा या परिषदेचा उद्देश असल्याचे डॉ. निकाळजे यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुधीर मोघे यांनी केले.महाक्रिटीकॉन परिषदेचा समारोपइंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीन आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या अतिदक्षता विभाग तज्ज्ञांच्या महाक्रिटीकॉन परिषदेचा रविवारी समारोप झाला. या परिषदेत ८०० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला.एमआयटी हॉस्पिटल, एमजीएम हॉस्पिटल, कमलनयन बजाज हॉस्पिटल, डॉ. हेडगेवार रुग्णालय, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल इ. ठिकाणी प्री-कॉन्फरन्स कार्यशाळा आणि चर्चासत्र झाले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.व्यंकटेश देशपांडे, डॉ. नोहुल पटेल, डॉ. संदीप वायघन, डॉ. योगेश देवगिरीकर, डॉ. प्रशांत वळसे, डॉ. विशाल ढाकणे, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. सचिन सूर्यवंशी, डॉ. योगेश लक्कस आदींनी पुढाकार घेतला.