सर्वसामान्यांची 'लालपरी' पुन्हा रस्त्यावर; औरंगाबादहून पुण्याला एसटी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:37 IST2020-08-20T11:07:14+5:302020-08-20T14:37:48+5:30
औरंगाबादहून एकूण १२ प्रवाशांना घेऊन एसटी रवाना

सर्वसामान्यांची 'लालपरी' पुन्हा रस्त्यावर; औरंगाबादहून पुण्याला एसटी रवाना
औरंगाबाद : मध्यवर्ती बस्सथनाकातून गुरुवारी सकाळी १२ प्रवाशांना घेऊन एसटी बस पुण्याला रवाना झाली.
मध्यवर्ती बस्सथनाकात सकाळी आगार व्यवस्थापक सुनील शिंदे यांच्या हस्ते एसटीचे पूजन करण्यात आले. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे आणि चालक, वाहक उपस्थित होते. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या १५१ दिवस दिवसांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक गुरुवारपासून सुरु झाली. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सर्वसामान्यांची 'लालपरी' पुन्हा रस्त्यावर धावली...
Posted by Lokmat Aurangabad on Thursday, 20 August 2020
मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी पुण्यासाठी पहिली बस रवाना झाली. त्यानंतर नाशिकला बस सोडण्यात आली. तब्बल पाच महिन्यानंतर एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी मोठे समाधान व्यक्त केले. एसटीच्या चालक वाहकांनीही एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.