शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

संचिका मंजुरीसाठी आयुक्तांना गराडा

By admin | Updated: September 4, 2014 00:56 IST

औरंगाबाद : महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना आज नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या संचिकांवर मंजुरी मिळण्यासाठी अक्षरश: घेराव घातला होता.

औरंगाबाद : महापालिकेचे मावळते आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना आज नगरसेवकांनी स्पील ओव्हरच्या संचिकांवर मंजुरी मिळण्यासाठी अक्षरश: घेराव घातला होता. खा.चंद्रकांत खैरे यांनी आजवर मिळेल तेथे आयुक्तांवर टीका केली. शिवसेना सदस्यांनी मात्र आयुक्तांच्या कार्यशैलीवर स्तुतिसुमने उधळली. विकासकामे, आर्थिक घडी बसविण्यासाठी आयुक्तांनी परिश्रम घेतल्याचे युती सदस्य म्हणाले. आयुक्तांना आज स्थायी समितीच्या बैठकीत सभापती विजय वाघचौरे यांच्या अध्यक्षतेखाली निरोप देण्यात आला. यावेळी नगरसेविका सत्यभामा शिंदे, संजय चौधरी, फिरदौस फातेमा यांनी स्पील व इतर कामांच्या संचिकांना मंजुरी देण्याची मागणी आयुक्तांकडे केली. बैठक संपल्यानंतर आयुक्तांच्या दालनात अनेक नगरसेवकांनी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. काल २ रोजी आयुक्तांच्या बंगल्यावर प्रलंबित संचिकांसाठी कंत्राटदार, बिल्डर, नगरसेवकांनी गर्दी केली होती. निलंबित अधिकाऱ्यांनाही आयुक्तांनी जाता-जाता पुन्हा कामावर घेतले आहे. नगररचना विभागाच्या अनेक संचिका आयुक्तांनी मंजूर केल्या. सदस्य त्र्यंबक तुपे, जगदीश सिद्ध, सुरेंद्र कुलकर्णी, मीर हिदायत अली, संजय चौधरी, फिरदौस फातेमा, सत्यभामा शिंदे, रवी कावडे, अनिल जैस्वाल, अनिल मकरिये यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. मी व्यक्तिगत समाधानी- डॉ.कांबळेस्थायी समितीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना मावळते आयुक्त डॉ.कांबळे म्हणाले, मनपात काम केल्यामुळे मी व्यक्तिगत समाधानी आहे. मी समांतरविरोधी असल्याचे आरोप झाले. हटवादी, जिद्दी, हेकेखोर असल्याचेही आरोप माझ्यावर झाले. मनपा ही संस्था महत्त्वाची समजून कायदेशीर काम केले. काही चुका झाल्या असतील. जाता-जाता अनेकांच्या संचिका पूर्ण केल्या आहेत. शिक्षण विभागात चांगले काम करता आले. १५०० कोटींची मनपाची कामे सुरू आहेत. मनपाचा दर्जा उंचावण्यात यश आले. उत्पन्नाचे नवीन स्रोत शासनाकडे कळविल्यामुळे पालिकेला क वर्गात प्रमोशन मिळाले. अ‍ॅप्रोच चॅनलसाठी साडेआठ कोटी, ५० कोटींचे रस्ते, भूमिगत गटार योजनेसाठी ४६५ कोटी, तीन वर्षांपासून रखडलेली ७९२ कोटींची समांतर जलवाहिनीची योजना, ११२ कोटींची पथदिव्यांची योजना मार्गी लावण्यासाठी काम केल्याचे ते म्हणाले.महापौरांना गहिवरून आले आयुक्तांनी जाण्यापूर्वी महापौर कला ओझा यांची भेट घेतली. महापौरांनी आयुक्तांचा सत्कार केला. १५०० कोटी रुपयांची कामे सुरू झाल्याबद्दल महापौरांनी आयुक्तांचे आभार मानले. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.