आयुक्तांनी घेतला ‘गुरुजीं’ चा वर्ग

By Admin | Updated: June 18, 2016 01:05 IST2016-06-18T00:03:43+5:302016-06-18T01:05:27+5:30

औरंगाबाद : शहरातील सर्वच छोट्या- मोठ्या खाजगी कोचिंग क्लासचालकांचाच शुक्रवारी ‘वर्ग’ भरला. स्थळ होते पोलीस आयुक्तालय अन् सर होते पोलीस आयुक्त अमितेशकुमार...

The Commissioner took the class of 'Guruji' and took it as 'Guruji' | आयुक्तांनी घेतला ‘गुरुजीं’ चा वर्ग

आयुक्तांनी घेतला ‘गुरुजीं’ चा वर्ग

औरंगाबाद : शहरातील सर्वच छोट्या- मोठ्या खाजगी कोचिंग क्लासचालकांचाच शुक्रवारी ‘वर्ग’ भरला. स्थळ होते पोलीस आयुक्तालय अन् सर होते पोलीस आयुक्त अमितेशकुमार... क्लाससमोरील बेशिस्त पार्किंग, सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आणि विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात, यावर अमितेश ‘सरांनी’ क्लासचालक गुरुजींना चांगलाच शिस्तीचा ‘धडा’ शिकविला...
शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट बनलेला आहे. त्यात मोठ्या शहरातील छोट्या- मोठ्या कोचिंग क्लासेससमोरील बेशिस्त पार्किंग अधिकच भर घालीत आहे. यातील बहुतांश क्लासेसला पार्किंगची स्वत:ची जागाच नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यांवरच उभी केली जातात. ज्यामुळे वाहतुकीला सतत अडथळा निर्माण होतो. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांनाही होतो. क्लासेसच्या परिसरातील नागरिकांनी या बेशिस्त पार्किंगबाबत पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. याशिवाय क्लासेसच्या परिसरात टवाळखोरांकडून विद्यार्थिनींना त्रास दिल्या जात असल्याच्याही तक्रारी होत्या.
याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी शहरातील सर्व कोचिंग क्लासचालकांची आयुक्तालयात बैठक बोलावली. या बैठकीला छोटे- मोठे असे सुमारे तीनशे कोचिंग क्लासचालक उपस्थित होते.
पार्किंग व्यवस्था करा
यावेळी अमितेशकुमार यांनी सर्व क्लासचालकांना पार्किंग व्यवस्था करण्याचे आदेश दिले. तुमच्याकडे येणारी मुले रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणार नाहीत, याची काळजी तुम्हीच घ्या. विद्यार्थी व्यवस्थित पार्किंग करतील, यासाठी वॉचमन ठेवा, असे आयुक्तांनी सुचविले. याशिवाय ज्या मुलांना त्यांचे पालक चारचाकी वाहनाने ने- आण करतात, त्या पालकांना वाहन दूर रस्त्याच्या कडेला उभे करून तेथून मुलाला पायी आणून सोडण्याची विनंती करा, असाही आयुक्तांनी क्लासचालकांना सल्ला दिला. कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे त्यांना बजावण्यात आले. त्याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून क्लासचालकांनी आपल्या क्लासच्या आवारात सुरक्षारक्षक नेमावा, सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशाही सूचना देण्यात आल्या.

Web Title: The Commissioner took the class of 'Guruji' and took it as 'Guruji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.