शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर

By admin | Updated: July 21, 2014 00:20 IST

बीड : शहरातील हॉटेल, वडापावसह इतर गाडे, स्विट होम आदी ठिकाणी सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहे.

बीड : शहरातील हॉटेल, वडापावसह इतर गाडे, स्विट होम आदी ठिकाणी सर्रास घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वापरले जात आहे. गंभीर बाब म्हणजे रहदारीची ठिकाणी उघड्यावर असे सिलिंडर वापरले जात असल्याने अनुचित घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते. असे असले तरी अशा लोकांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावले जात आहे. घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलिंडर शासनाच्या वतीने सवलतीच्या किंमतीमध्ये देण्यात येतात. मात्र, अनेक व्यावसायिक अशा सिलिंडरचा सर्रास वापर करतात. शहरातील सुभाष रोड, स्टेडियम परिसर, बशीरगंज, राजुरी वेस परिसर, बसस्थानकासमोरचा परिसर अशा अनेक ठिकाणी काही छोटे व मोठे व्यावसीयाक गॅस सिलिंडरचा वापर करतात. गॅस वापरताना त्यांच्याकडून कोणतीही सुरक्षितता बाळगली जात नसल्याने धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा सिलिंडर वापरावर कारवाईची मागणी होत आहे. अशा वापरासह काही वाहनांमध्येही अनधिकृतपणे सिलिंडर वापरले जाते. अशांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून संतापही व्यक्त होत आहे. गंभीर बाब म्हणजे काहींकडून असे अनधिकृत सिलिंडर विक्रीही केले जात आहे. अशा वेळी चढ्या दराने सिलिंडर विक्री करून काळाबाजार होत आहे़ त्यामुळे असे प्रकार थांबविण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)यात्रेतील दुकानात झाला होता स्फोटमाजलगाव तालुक्यातील बाराभाई तांडा येथे यात्रा होती़ एका तंबूत छोटेखानी हॉटेल होते़ या ठिकाणी अनधिकृत गॅस सिलिंडर वापरण्यात येत होते़ यावेळी गॅस व्यवस्थित न हाताळल्याने स्फोट झाला होता़ यामध्ये काही भाविक जखमी झाले होते़ असे प्रकार होऊ नयेत म्हणून अनधिकृत गॅस सिलिंडर वापराला बंदी घालण्याची मागणी आहे़बीडच्या गाड्यांची बाहेर जिल्ह्यात पासिंगबीड जिल्ह्यात चार चाकी वाहनांमध्ये अधिकृत गॅस भरण्याची सुविधा नसल्याने येथे गॅसवरील गाड्यांची आरटीओ कार्यालयात पासिंगही होऊ शकत नाही़ त्यामुळे बीडमधील काही लोकांनी बाहेर जिल्ह्यात आपल्या गाड्यांची पासिंग केलेली आहे़ अशा गाड्या आता बीडमध्ये सर्रास दिसून येत आहेत़ या गाड्यांमध्ये अनधिकृतपणे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर वापरण्यात येत असल्याचे दिसून येत आहे़ अनेकदा रस्त्यावरच वाहनचालक घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस वाहनाच्या टाकीत भरतात़ यामध्येही जीवितास प्रचंड धोका असला तरी काही पैशांची बचत होत असल्याने वाहनचालक हा धोका पत्कारत असल्याचे सर्रास दिसून येत आहे़