शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर ढग, रात्री टिप्पूर चांदणे

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

विठ्ठल कटके, रेणापूर तालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही

विठ्ठल कटके, रेणापूरतालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. दुबार पेरणी झाली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने गुंगारा दिल्याने उगवलेले सोयाबीन माना टाकू लागले आहे. पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असल्याने तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे. तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना तब्बल पंधरा दिवस उशीर झाला. त्यात उडीद-मूग या पिकात मोठी घट झाली. त्याची जागा सोयाबीन पिकाने घेतली. तालुक्यात तब्बल तीस हजार हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा आहे. पेरणीनंतर मध्यंतरी पाऊस न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यात शेकडो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला.२२ जुलैअखेर तालुक्यात रेणापूर विभागात १२८ मि.मी. पानगाव विभागात-१२२ मि.मी., पोहरेगाव विभागात-१७८ मि.मी. तर कारेपूर विभागात १४५ मि.मी. असा एकूण सरासरी १४३ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघाड दिल्याने उगवलेले सोयाबीन व इतर पिके पावसाअभावी माना टाकीत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, त्यात जोराचा वारा तर रात्री टिप्पूर चांदणे पडत आहे़ त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. आठवड्यात जर मोठा पाऊस झाला, तरच पिके हाती लागतील. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामोरे जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हजारो शेतकरी आभाळाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.तालुक्यात पोहरेगाव, पळशी, शेरा, निवाडा, सिंधगाव, दर्जी बोरगाव, इंदरठाणा, सांगवी, भोकरंबा, आंदलगाव, लखमापूर, डिगोळ देशमुख आदी भागांत ऊस व इतर खरीप पिकांचे रानडुकरांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उसाची तर मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. शिवाय, हरीण व इतर वन्यप्राण्यांचाही पिकांना उपद्रव होत असल्याचे शेतकरी व्यंकटी कातळे, राम मोरे, गंगासिंह कदम, दगडू सावंत, अ‍ॅड. प्रमोद जाधव यांनी सांगितले़गेल्या रबी हंगामात ज्वारीचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे कडबा उपलब्ध नाही. यामुळे हिरवा चारा नाही. त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाला आहे. हिरवा चारा नसल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी जनावरांना पेंड, सोयाबीनची गुळी हेच खाद्य देत आहेत. पशुधनांचे हाल सुरु़़़पावसाची सरासरी अत्यंत कमी झाल्यामुळे यावर्षी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होतो की काय? अशी स्थिती सध्या आहे. अनेक पाझर तलावात अपुरे पाणी आहे़ रेणा धरणात काही अंशी पाणीपातळी वाढली आहे. शिवाय, हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध नाही. नद्या-नाल्यांना पाणी नसल्याने जनावरांचे मोठे हाल होत आहेत.