शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

आगारप्रमुखांना भेटण्यासाठी आलेल्या प्रवाशाला कोठडी!

By admin | Updated: June 25, 2014 01:27 IST

पैठण : पैठण एस.टी. आगार प्रमुखांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाला सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. यातून सुरक्षा रक्षक व प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

पैठण : पैठण एस.टी. आगार प्रमुखांची भेट घेण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाला सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला. यातून सुरक्षा रक्षक व प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. सुरक्षा रक्षकाने कायद्याचा आधार घेत सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद पोलीस स्टेशनला दाखल केली. एस.टी.त बसण्याऐवजी प्रवाशास रात्रभर पोलीस स्टेशनच्या कारागृहात बसावे लागले. चनकवाडी येथील प्रवाशी आत्माराम सोनाजी भोसले यास आगारप्रमुख वावरे यांना भेटण्याची इच्छा झाली. आगाराच्या प्रवेशद्वारावर त्याची डेपोचे सुरक्षा रक्षक दत्तात्रय बप्पासाहेब पाचे यांच्याशी गाठ पडली. आगारप्रमुखांना भेटायचे आहे, असे आत्मारामने सांगितले. आगारप्रमुख आगारात नाहीत असे सुरक्षा रक्षक पाचेंनी आत्मारामला सांगितले; परंतु मी आगार प्रमुखांना आगारात जाताना पाहिले तू कसा खोटे बोलतो, असे आत्मारामने पाचे यांना सुनावले. यातून दोघांत चांगलीच जुंपली. प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेले. प्रकरण एवढे गंभीर नाही आपणास मिटवून घ्या कशाला गुन्हा दाखल करता, असा तंटामुक्तीचा सल्ला पोलिसांनी एस.टी. अधिकाऱ्यांना दिला; मात्र तो त्यांनी ऐकला नाही. गुन्हा दाखल झालाच.आम आदमीचा आवाज दबेलया प्रकरणात चूक प्रवाशाची की डेपो सुरक्षा रक्षकाची हे पोलीस तपासात किंवा न्यायालयात सिद्ध होईल; परंतु कायद्याचा धाक दाखवून अनेक कार्यालयात आम आदमीचा आवाज दाबला जात आहे. यामुळे अन्याय बरा; परंतु न्यायासाठी दाद मागणे नको, असे म्हणत सरकारी बाबूंशी पंगा नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.