शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जपानी स्वच्छतादूतांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By admin | Updated: August 26, 2014 01:52 IST

औरंगाबाद : भारत-जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत मागील तीन वर्षांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानाला आज गजानन महाराज मंदिर

औरंगाबाद : भारत-जपान मैत्री कार्यक्रमांतर्गत मागील तीन वर्षांपासून शहरात राबविण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानाला आज गजानन महाराज मंदिर परिसरातून सुरुवात झाली. जपानहून आलेल्या ७ स्वच्छतादूतांच्या उपस्थितीत सकाळी ७.३० वा. हे अभियान सुरू झाले. या अभियानातून जपानी स्वच्छतादूतांनी शहराला स्वच्छतेचा संदेश दिला. तीन वर्षांपासून जपानी दूत शहरात येऊन जनजागृतीसाठी येत आहेत. मात्र, यावर्षी मनपाकडून हे अभियान नावापुरतेच घेतल्यासारखे दिसले. औरंगाबाद सिटी मेगा क्लिनिंग इव्हेंट आॅर्गनायझिंग कमिटीचे चैतन्य भंडारे आणि गिरीश मगरे यांच्या पुढाकाराने हे अभियान शहरात घेण्यात आले. एक तास शहरातील सर्व भागांमधील कचरा संकलन करून शहर स्वच्छ करण्याचा अभियानामागील मूळ उद्देश होता. महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातच अभियानाची सुरुवात होती आणि त्यांचीच गैरहजेरी होती. त्यांना अचानक महापौर परिषदेसाठी डेहराडूनला जावे लागले. त्यामुळे त्या अभियानाला गैरहजर होत्या, असे मनपाकडून सांगण्यात आले. जपानहून आलेले स्वच्छतादूत तोशिओ चिगुसा, जिनसुके सासाकी, ताकाफुमी एबिसो, अकितो साकाई, इत्सुकी स्वादा, मेगुमी सुरूगा, वाकाकाओ कुजिटा, चैतन्य भंडारे यांच्यासह सभापती विजय वाघचौरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, सभागृह नेते किशोर नागरे, नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी, सूर्यकांत जायभाये, आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, उपायुक्त रवींद्र निकम, आरोग्य अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर, स्वच्छता निरीक्षक ज्ञाते, खांदेवाले, मीना माळी, पी.जी.पंदारे, संतोष वाचासुंदर, मर्कड, शे.रज्जाक आदींनी अभियानात सहभाग नोंदविला. १ तास शहरासाठीशहरातील वेगवेगळ्या भागात १ तास कचरा संकलन केले जावे. त्यामध्ये शाळकरी विद्यार्थी, एनजीओ, सामाजिक सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय नागरिकांनी सहभागी व्हावे. असा संदेश मागील तीन वर्षांपासून जपानी दूत देत आहेत. पहिल्या वर्षी माजी महापौर अनिता घोडेले यांच्या कारकीर्दीत हे अभियान पहिल्यांदाच झाले. घोडेले यांनी जपान दौराही भारत-जपान मैत्री अंतर्गत केला. त्यानंतर दुसऱ्यावर्षी अभियानास प्रतिसाद मिळाला. मनपाचा दावा असाघनकचरा विभागप्रमुख डी.डी. सूर्यवंशी यांनी दावा केला की, २२०० कर्मचारी अभियानात सहभागी झाले होते. मनपा शाळेच्या १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ७ ते ८ हजार नागरिकही अभियानात सहभागी झाले होते. रोज ३५० मेट्रिक टन कचरा उचलला जातो. आज ५०० टन कचरा उचलला गेल्याचा दावा त्यांनी केला. गजानन महाराज मंदिर येथे ७ वा. अभियानाची वेळ ठेवण्यात आली होती. अभियान उशिरा सुरू झाले. तेथे अधिकारी, कर्मचारी, एनजीओचे मिळून २०० जणांनी अभियानात सहभाग घेतला. संत गाडगेबाबांच्या वेशात खंडूजी गायकवाड, चार्ली चॅपलिनच्या वेशात सोमनाथ सोभावणे यांनीही स्वच्छतेचा संदेश दिला. शिवनेरी मित्रमंडळ, नगरसेवक प्रमोद राठोड यांचे स्वाभिमान मित्रमंडळाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी अभियानात सहभाग नोंदविला. शिवनेरी मित्रमंडळाचे अ‍ॅड. शिंदे, आगलावे, खोतकर, विशाल अहिरराव, चौधरी आदी सदस्य अभियानात सहभागी होते. मनपा व काही शाळांच्या विद्यार्थ्यांनीही अभियानात सहभाग नोंदविला.