शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 17:13 IST

शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे.

ठळक मुद्देमागील सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर तब्बल पाच तास घसा कोरडा केला होता. मंगळवार १ मेपासून शहरातील पाणीपुरवठाच एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे.

औरंगाबाद : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे. जायकवाडीहून येणारे पाणी आणि मागणी यात दुप्पट फरक पडला आहे. 

मागील सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर तब्बल पाच तास घसा कोरडा केला होता. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाला सक्त ताकीद दिली होती की, तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. महापालिकेतील सर्वोच्च सभागृहाचा आदेशही पाणीपुरवठा विभागाने पायदळी तुडविला. शहरातील एकाही वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अधिकाऱ्यांना यश आले नाही. शहरातील पन्नास टक्के वॉर्डांना ऐन कडक उन्हाळ्यात पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतोय. मोजक्याच वॉर्डांवर हा अन्याय होत असतानाही संबंधित वॉर्डाचे नगरसेवकही मूग गिळून आहेत.

कधी तरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याशिवाय दुसरे काहीच करीत नाहीत. त्यातच सोमवारी रात्री उशिरा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अपुरा होत आहे. उंच भागातील टाक्या भरण्यास त्रास होतो. त्यामुळे मंगळवार १ मेपासून शहरातील पाणीपुरवठाच एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते त्यांना बुधवारी पाणी मिळेल. बुधवारी ज्या नागरिकांना पाणी देण्यात येणार होते त्यांना आता गुरुवारी आणि शुक्रवारचा पाणीपुरवठा शनिवारवर ढकलण्यात आला आहे.  महापालिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जुन्या शहरातील वॉर्डांना बसणार आहे. अगोदरच या भागातील वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी मिळत असे. मनपाने आणखी एक दिवसाची भर टाकली आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई