शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिसमसच्या स्वागतासाठी शहर उजळले

By admin | Updated: December 25, 2014 00:47 IST

औरंगाबाद : अवघ्या विश्वाला प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी पृथ्वीवर अवतरले तो २५ डिसेंबरचा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो.

औरंगाबाद : अवघ्या विश्वाला प्रेम आणि शांतीचा संदेश देणारे प्रभू येशू ख्रिस्त ज्या दिवशी पृथ्वीवर अवतरले तो २५ डिसेंबरचा दिवस जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. प्रभूच्या जन्मदिनासह नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील चर्च रोषणाईने उजळून निघाले आहेत. नव्या इच्छा, आकांक्षा घेऊन नव्या वर्षाला सामोरे जाण्यासाठीचा दिवस म्हणजे ख्रिसमस अर्थात नाताळ. या सणाचे वेध तसे डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच लागत असल्याचे ख्रिस्ती बांधवांनी सांगितले. शहरातील शंभराहून अधिक चर्च सध्या रोषणाई, मेणबत्त्या, झिरमिळ्यांनी प्रकाशात न्हाऊन निघाले आहेत. यात छावणी भागातील ख्राइस्ट चर्च, नगर नाक्याजवळील ट्रिनिटी चर्च व सेंट इव्हेंज्युअलिस चर्च सर्वाधिक जुने आहेत. प्रभू येशू व माता मेरीच्या प्रतिमांनाही सजविण्यात आले आहे. भेटवस्तू, रिबिन्स आणि रोषणाईने सजविलेले ख्रिसमस ट्री लक्ष वेधून घेत होते. शहरभर लाल पोशाख आणि पांढरीशुभ्र दाढी घेऊन फिरणारे सांताक्लॉज चिमुकल्यांना भेटवस्तूंची उत्सुकता लावत होते. गेले पंधरा दिवस कैरोल सिंगिंगने सुरू झालेली ही तयारी व त्याचा उत्साह गुरुवारी मध्यरात्रीही कायम असणार आहे. आज रात्री १०.३० वाजता कैरोल सिंगिंग आणि सामुदायिक प्रार्थना झाली. त्यानंतर ११ वाजता पवित्र मिसा झाला. यात प्रस्तावना, आरती, विनंत्या, अर्पणाचे दान, प्रार्थना झाली. त्यानंतर बांधवांनी केकचा आनंद घेतला. अनेक चर्चमध्ये महिलांसाठी नाताळच्या रेखाटनांवर रांगोळी स्पर्धाही घेण्यात आली. प्रभू येशूचा जन्म गोठ्यात झाला, असे मानण्यात येते. यानुसार गव्हाण बनविण्याच्या स्पर्धाही आज उत्साहात पार पडल्या. सेंट फ्रान्सिस चर्चचे फादर लेस्ली रॉड्रिग्ज म्हणाले की, परस्परांमधील मतभेद विसरून एकत्र यावे, पवित्र प्रार्थना व विधींमधून मनाला पवित्र करावे हा ख्रिसमसचा खरा उद्देश आहे. प्रभू येशू वाईटाचा नाश करण्यासाठी अवतार घेत असतो. आपण सद्वर्तन आणि चांगल्या मनाने त्याच्या स्वागताला सज्ज असावे, हा प्रयत्न प्रत्येक जण करतो.