शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

शहर गुन्हे शाखेचे विभाजन

By admin | Updated: June 2, 2014 01:33 IST

औरंगाबाद : पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी मुकुंदवाडी, सिडको, जवाहरनगर व गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांची खांदेपालट केली.

 औरंगाबाद : पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी मुकुंदवाडी, सिडको, जवाहरनगर व गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांची खांदेपालट केली. या शिवाय आयुक्तालयातील गुन्हेशाखेचे विभाजन करण्याचा धडाकेबाज निर्णय घेतला. शहरातील वाढता गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता आयुक्त राजेंद्र सिंह यांनी आयुक्तालयात असलेल्या गुन्हे शाखेची दोन भागात विभागणी करण्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे गुन्हे शाखा झोन-१ व गुन्हे शाखा झोन-२ या पद्धतीने काम करील. याशिवाय गुन्ह्यांच्या तपासाची स्पर्धाही लागेल. ज्यामुळे ‘डिटेक्शन’चा आलेख वाढेल, असा आयुक्तांचा कयास आहे. गुन्हे शाखेच्या झोन-१ च्या निरीक्षकपदाची धुरा आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे, तर झोन-२ च्या निरीक्षकपदाची धुरा सिडको ठाण्याचे निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. निरीक्षक हेमंत कदम यांची सुरक्षा विभागात तर जयकुमार चके्र यांची नियुक्ती पोलीस कल्याण विभागात करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेचा अतिरिक्त पदभार निरिक्षक गौतम पातारे यांच्याकडे सोपवण्यात आला. आयुक्तालयातील सध्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक रामेश्वर थोरात यांची नियुक्ती विशेष शाखेत करण्यात आली असून, विशेष शाखेचे निरीक्षक बोरसे यांच्याकडे वाहतूक शाखा सोपविण्यात आला आहे. सिडको ठाण्याच्या निरीक्षकपदी पोलीस कल्याण विभागाचे निरीक्षक राजकुमार डोंगरे, तर मुकुंदवाडी ठाण्याच्या निरीक्षकपदी नुकतेच लातूर येथून बदलून आलेले प्रेमसागर चंद्रमोरे यांची वर्णी लावण्यात आली आहे. जवाहरनगर ठाण्याच्या निरीक्षकपदी जालना पोलीस प्रशिक्षण केंद्र येथून बदलून आलेले शेख सलीम अब्दुल रहीम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सहा. निरिक्षक कृष्णा शिंदे यांची नियुक्ती आर्थिक गुन्हे शाखेत करण्यात आली.