शहर पुन्हा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:43 PM2019-06-10T23:43:35+5:302019-06-10T23:43:58+5:30

शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.

The city again darkens | शहर पुन्हा अंधारात

शहर पुन्हा अंधारात

googlenewsNext
ठळक मुद्देवीज यंत्रणेला फटका : वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित

औरंगाबाद : शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र, अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.
वादळी पावसामुळे साडेचार वाजेच्या सुमारास महावितरणच्या हिमायतबाग उपकेंद्रातून निघणाºया ११ केव्हीच्या सिटीचौक, रोजाबाग, नेहरू भवन व गणेश कॉलनीतील वीजपुरवठा बंद पडला. दुरुस्तीनंतर गणेश कॉलनी वगळता उर्वरित वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर, कटकटगेट व सेव्हन हिल या भागात विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तापडिया नाट्य मंदिराजवळ ११ केव्ही वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने औरंगपुरा, निराला बाजार परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.
पावसामुळे सिडको व चिकलठाणा परिसरातही सायंकाळी दोन तास वीजपुरवठा बंद होता. ३३ केव्हीच्या ३ वाहिन्या बंद पडल्याने गारखेडा परिसर, समर्थनगर, पैठणगेट, रंगमंदिर, उस्मानपुरा, दूध डेअरी परिसरातही चार तास वीज नव्हती. छावणी, भावसिंगपुरा परिसरातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा पावसामुळे खंडित झाला. जाधववाडी उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाल्यामुळे आरतीनगर, पिसादेवी रोड, श्रीकृष्णनगर, पवननगर, आंबेडकरनगर या भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.
महावितरणच्या अभियंते-कर्मचाºयांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा सायंकाळपर्यंत पूर्ववत झाला. परंतु अधिक नुकसान असलेल्या ठिकाणी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.
चौकट...
दूरध्वनी ‘नॉट रिचेबल’ नागरिकांना समाधानकारक उत्तरे नाही
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक महावितरणच्या दूरध्वनींवर संपर्क साधून वीज कधी येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, अनेक ठिकाणी दूरध्वनी उचलला जात नव्हता. दूरध्वनी उचलला गेला तर समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार संपर्क करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
-----------

Web Title: The city again darkens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.