शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतमधील दफ्तर तपासणीवर नागरिकांतून शंका

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

पाटोदा: जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुरेशी यांनी पाटोदा ग्रामपंचायतची दफ्तर तपासणी केली होती.

पाटोदा: जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुरेशी यांनी पाटोदा ग्रामपंचायतची दफ्तर तपासणी केली होती. या तपासणीसंदर्भात पाटोदा येथे मात्र शंका- कुशंकांनी जोर चढला आहे. दफ्तर तपासणीदरम्यान ‘कुछ नही मिला’ असे कुरेशी वारंवार भ्रमणध्वनीवरून कोणाला तरी बोलत होते. याची तर नागरिकांतून अधिकच चवीने चर्चा होत आहे.गेल्या काही दिवसांपासून ग्रामसेवक आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर आहेत. या संपात पाटोदा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनीही सहभाग घेतलेला आहे. ग्रामसेवक संपावर असल्याने ग्रामपंचायतमधील कपाटांना कुलूप आहे. असे असले तरी कुरेशी यांनी बुधवारी दुपारी एक वाजता पाटोदा ग्रामपंचायतमध्ये येऊन दफ्तराची तपासणी केली. यावेळी तेथे प्रभारी गटविकास अधिकारी राख यांच्यासह जाधव, शिंदे हे कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे कुरेशी यांनी सर्व कागदपत्रांची मागणी केली. यावेळी कपाट बंद असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. यानंतर कपाटाचे कुलूप तोडून तपासणी केली.ही तपासणी तब्बल तासभर चालली. यादरम्यान कुरेशी यांना वारंवार फोन येत होते. त्या फोनवर ‘कुछ नही मिला, अरे साब कुछबी नही मिला’ असे कुरेशी म्हणत असल्याचे उपस्थित इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले. ग्रामसेवक संपावर असल्याची माहिती असतानाही कुरेशी यांनी कपाटाचे कुलूप तोडून तपासणी का केली? अशी कोणती गंभीर बाब होती की त्यासाठी कपाटाचे कुलूप तोडावे लागले? असे प्रश्न आता नागरिकांतून चौकाचौकात चर्चिले जाऊ लागले आहेत. पाटोदा ग्रामपंचायतीअंतर्गत मागील काही वर्षांत कोट्यवधी रुपयांची कामे झालेली आहेत. अस्तित्वात नसलेल्या वसाहती, दलित वसाहत, बारावा व तेरावा वित्त आयोगातील कामे, राष्ट्रीय पेयजल, स्वजलधारा नळयोजना, शौचालय योजना अशा विविध कामांवर खर्च झालेला आहे. अशा कामासंदर्भात नागरिकांमधून वारंवार तक्रारी होत आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीची तपासणी झाल्यामुळे व कुरेशी यांच्या भ्रमणध्वनीवरील त्या वक्तव्यामुळे पाटोदा शहरात समज- गैरसमज वाढल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. या दौऱ्यानिमित्त नागरिकांतून शंकाही व्यक्त केली जात आहे. भ्रमणध्वनीवरील संभाषणाची तर नागरिक चवीने चर्चा करीत आहेत. (वार्ताहर)