शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रभू येशूच्या जयघोषात नाताळ साजरा

By admin | Updated: December 26, 2014 00:15 IST

औरंगाबाद : उत्साहपूर्ण वातावरणात आज शहरात प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस नाताळ साजरा करण्यात आला.

औरंगाबाद : मेरी ख्रिसमस म्हणत एकमेकांना दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा, प्रभू येशू ख्रिस्तांच्या नावाचा जयघोष, गर्दीमुळे चर्च परिसराला आलेले जत्रेचे स्वरूप, पिपाण्यांचा आवाज, अशा उत्साहपूर्ण वातावरणात आज शहरात प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस नाताळ साजरा करण्यात आला. छावणीसह शहरातील सर्वच चर्चमध्ये बुधवारी मध्यरात्रीपासून खिस्त जन्माच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला केक कापून येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात आला. छावणीतील सर्वात मोठ्या क्राईस्ट चर्चला तर जत्रेचे स्वरूप आले होते. चर्च परिसरात दिवसभर ख्रिस्ती बांधवांची गर्दी उसळली होती. लहान मुलांसाठी येथे मोठ्या प्रमाणावर खेळण्यांची दुकाने लावण्यात आली होती. क्राईस्ट चर्चमध्ये बुधवारी रात्री १२ वाजता प्रार्थना झाली. रेव्हरंड डॉ. सी. एन. आठवले यांनी याप्रसंगी उपस्थितांना नाताळचा संदेश दिला. यावेळी चर्चचे प्रमुख सुशील घुले, रेव्हरंड प्रकाश नाडे, रेव्ह. विपुल बत्तीसे यांनी धार्मिक विधी पार पाडण्यास सहकार्य केले. प्रार्थनेनंतर केक कापून ख्रिस्त जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी १०.३० वाजता नाताळनिमित्त विशेष प्रार्थना झाली. यामध्ये हजारो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले. याप्रसंगी चर्चच्या गायकवृंदांनी धार्मिक गीते सादर केली. त्यानंतर उपस्थितांकडून धान्य, फळे आणि इतर विविध प्रकारच्या भेट वस्तू चर्चला अर्पण करण्यात आल्या. यावेळी चर्चमध्ये आणि चर्चच्या परिसरात उपस्थितांकडून एकमेकांना मेरी ख्रिसमस म्हणून नाताळच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या. लहान मुले, तरुण, वयोवृद्ध अशा सर्वच वयोगटातील स्त्री- पुरुषांनी नाताळनिमित्त चर्चमध्ये गर्दी केली होती. छावणीतील बिशप चर्च तसेच एन-७ येथील चर्च आणि शहरातील इतर चर्चमध्ये सकाळी नाताळची विशेष प्रार्थना पार पडली.