शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

‘चटणी’फेम चोरांचा धुडगूस

By admin | Updated: February 3, 2015 00:59 IST

बीड : डोळ्यात चटणीपूड टाकून पैशाच्या बॅगा हिसकावणाऱ्या चोरांनी शहरात सोमवारी रात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. एमआयडीसी व विप्रनगर भागात

बीड : डोळ्यात चटणीपूड टाकून पैशाच्या बॅगा हिसकावणाऱ्या चोरांनी शहरात सोमवारी रात्री अक्षरश: धुमाकूळ घातला. एमआयडीसी व विप्रनगर भागात अवघ्या दोन तासाच्या अंतराने घडलेल्या या घटनांनी पोलिसही हादरून गेले आहेत. चोरांनी व्यापाऱ्यांना टार्गेट केल्याने दहशत निर्माण झाली आहे.जवाहर श्रीराम चरखा हे व्यापारी असून जुना मोंढा भागात त्यांचे पायल इंडस्ट्रिज नावाचे पेंडीचे दुकान आहे. शिवाय एमआयडीसी भागात त्यांची आॅइलमिल देखील आहे. मुनीम भरत राऊत याच्यासोबत ते दुचाकी क्र. (एम. एच. २३ एई- ७२११) वरुन जुन्या मोंढ्यातील दुकानावरुन एमआयडीसी भागातील आॅईलमिलकडे पाच लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते. त्यांची दुचाकी रामीतर्थ चौकातून आॅईल मिलजवळ पोहोचताच पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना ओव्हरटेक केला. त्यानंतर चरखा यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. चरखा यांनी अशा स्थितीतही बॅग सोडली नाही. मात्र चोरांनी त्यांचा पाठलाग करून कोयत्याचा धाक दाखवत बॅग हिसकावली. मुनीम राऊत भयभीत झाला. त्याने आरडाओरड केली. माकडटोप्यांचा केला वापरओळख लपविण्यासाठी चोरांनी माकडटोप्या घातल्या होत्या. बॅग चोरीचे काम फत्ते करून त्यांनी दोन मिनिटात धूम ठोकली.अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, उपअधीक्षक गौरव सिंह, सुधीर खिरडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत पेठ बीड ठाण्यात दोन्ही घटनांच्या संदर्भाने गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)एमआयडीसी भागात चरखा यांची बॅग पळविल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या दोन तासात छाया ट्रेडर्स या किराणा दुकानाचे मालक प्रेमचंद संचेती यांच्यावरही असाच प्रसंग रात्री साडेनऊ वाजता विप्रनगर भागात बेतला.४मुनीम सचिन यादव याच्यासमवेत संचेती दुचाकी (क्रमांक एमएच २३/५२९७) वरून दिवसभर केलेल्या व्यवसायाची रक्कम बॅगेत घेऊन घरी जात होते. पुलावर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. डोळ्यात चटणी फेकून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. संचेतींनी विरोध केला.४झटापटीत त्यांच्या हातावर जखम झाली. मात्र रक्कम वाचली.४चरखा प्रकरणात पोलिस गुंतलेले असताना विप्रनगरात ही घटना घडली.