शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

मुख्यमंत्र्यांचा आदेश 'बेदखल'! कर्जवसुली स्थगित असताना आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:17 IST

उंडणगावच्या आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेची कर्जवसुलीसाठी नोटीस

उंडणगाव : सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले असताना बँक ऑफ बडोदाने कर्ज वसुलीची शेतकरी कन्हैया दगडू बसैये यांना नोटीस बजावल्याची बाब ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात चव्हाट्यावर आणली होती. त्यानंतर आणखी ३५ शेतकऱ्यांना याच बॅंकेने कर्जवसुलीची नोटीस बजावल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी सदरील प्रतिनिधीकडे केली आहे.

अतिवृष्टीने खरीप पिकांचा चिखल झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच कर्जवसुलीला स्थगिती दिली असल्याचे सांगितले असताना बॅंका मात्र मुख्यमंत्र्यांचा आदेश ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. बुधवारच्या अंकात उंडणगाव येथील शेतकरी कन्हैया दगडू बसैये यांना बँक ऑफ बडोदाने तालुका विधी प्राधिकरणामार्फत थकीत कर्ज, त्यावरील व्याज व अन्य खर्च अशी रक्कम भरण्याची नोटीस दिल्याची व्यथा ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात मांडली होती. याची दखल घेऊन प्रशासन कारवाई करील अशी अपेक्षा होती; परंतु बॅंक प्रशासनाला याचे काहीही घेणे देणे दिसत नाही. गावातील आणखी ३५ शेतकऱ्यांना बॅंकेने कर्जवसुलीची नोटीस बजावल्याची बाब बुधवारी समोर आली. ‘लोकमत’चे वृत्त वाचून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सदरील प्रतिनिधीकडे मांडल्या. तसेच बॅंकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

कर्जदारासह जामीनदारास आज न्यायालयात बोलावलेदरम्यान, ‘लोकमत’ने शेतकरी कन्हैयालाल बसैये यांची व्यथा बुधवारच्या अंकात मांडली होती. त्यानंतरही बँक ऑफ बडोदाने थकबाकी कर्जाच्या वसुलीसाठी बसैये यांच्यासह त्यांच्या कर्जास जामीन राहिलेले शेतकरी विनोद पंडित यांना सिल्लोड येथील न्यायालयाने गुरुवारी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे बसैये यांच्यासह पंडित यांचाही मानसिक ताण अधिकच वाढला आहे. याबाबत शेतकरी कन्हैयालाल बसैये म्हणाले, शेतीवर घेतलेले कर्ज फेडायचं आपण ठेवलं आहे. याबाबत स्वतः बँकेच्या शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. तरीही माझे म्हणणे न ऐकता बँकेने मला कोर्टाची नोटीस बजावली आहे. यंदा उत्पन्नच नाही. तर कर्ज कसे भरू, असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chief Minister's order ignored! Bank notices 35 more farmers for loan recovery.

Web Summary : Despite CM's loan recovery stay order due to crop loss, Bank of Baroda issued notices to 35 more farmers in Undangaon, adding to their distress. Farmers express outrage.
टॅग्स :bankबँकFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस