शिक्षिका प्रचारात कशा काय? भाजपचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला सवाल, वाद पोलिस ठाण्यापर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:27 IST2026-02-06T11:27:04+5:302026-02-06T11:27:24+5:30

वडगाव गट क्र. ५१ मध्ये भाजप-शिंदेसेना आमनेसामने;

Chhatrapati Sambhajinagar ZP election: What is the teacher doing in the campaign? BJP questions Shinde Sena candidate | शिक्षिका प्रचारात कशा काय? भाजपचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला सवाल, वाद पोलिस ठाण्यापर्यंत

शिक्षिका प्रचारात कशा काय? भाजपचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला सवाल, वाद पोलिस ठाण्यापर्यंत

वाळूज महानगर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव गट क्रमांक ५१ मध्ये भाजप व शिंदेसेनेच्या उमेदवारांमध्ये प्रचारावरून चांगलीच जुंपली असून, हा वाद थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याची घटना घडली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

जिल्हा परिषदेच्या वडगाव कोल्हाटी मध्य-पश्चिम गटात शिंदेसेनेचे उमेदवार हनुमान भोंडवे आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड यांच्यात थेट लढत होत आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराला वेग आला आहे. वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आम्ही संस्थेची परवानगी घेतलीये....
बजाजनगर परिसरात शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एका शाळेतील शिक्षिका सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला. ज्ञानदानाचे कर्तव्य बाजूला ठेवून शाळा बुडवून प्रचारात सहभागी होत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. या घटनेनंतर दोन्ही उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला असून, प्रकरण वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी तक्रार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधित शिक्षिकांनी संस्थेची परवानगी घेऊन स्वेच्छेने प्रचारात सहभागी झाल्याचे सांगितले आहे. या प्रकरणामुळे दोन्ही पक्षांमध्येच संघर्ष उफाळून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, निवडणूक प्रचाराला वेगळे वळण मिळाले आहे.

Web Title : शिक्षिका प्रचार में? बीजेपी का उम्मीदवार पर सवाल; विवाद थाने तक।

Web Summary : वाड़गांव में बीजेपी और शिंदे सेना के उम्मीदवारों के बीच प्रचार को लेकर विवाद हो गया, जो थाने तक पहुंच गया। बीजेपी ने शिंदे सेना के लिए एक शिक्षिका के प्रचार में शामिल होने पर सवाल उठाया, जिससे दोनों पक्षों की शिकायतें हुईं और राजनीतिक तनाव बढ़ गया।

Web Title : Teacher campaigning? BJP questions candidate; dispute reaches police station.

Web Summary : A dispute erupted between BJP and Shinde Sena candidates in Wadgaon over campaigning, escalating to the police station. The BJP questioned a teacher's involvement in campaigning for Shinde Sena, leading to complaints from both sides and heightened political tension.