शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल विचारताच चंद्रकांत खैरे यांनी हात जोडले अन्...; एकच वाक्य बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 6:22 PM

राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हात जोडून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. 

लोकसभा निडवणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट करत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर महायुतीची ताकद नक्कीच वाढली आहे. आता, राज ठाकरे यांच्या या भूमिकेसंदर्भात महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार, शिवसेना नेते तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी हात जोडून एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. 

खरे तर, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर, महायुती आणि विरोधी पक्षांतीलही अनेक नेत्यांकडून राज यांच्या भूमिकेसंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. यातच, राज ठाकरे काल म्हणाले मोदींना पाठिंबा देणार, पण अनेक जण म्हणतायेत की, त्यांची भूमिका संभ्रमात आहे? असा प्रश्न चंद्रकांत खैरे यांना केला असता, त्यांनी लगेच हात जोडले आणि मी त्यांच्या बद्दल काही बोलत नाही, असे म्हणाले. यावर, त्यांच्याबद्दल बोलणे का टाळत आहात? असे विचारले असता, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बाबतीत आपण कशाला बोलायचे, असे म्हणत खैरे यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देणे नम्रपणे टाळले. ते टीव्ही ९ सोबत बोलत होते.

"मला तर यश मिळणारच" - संभाजीनगर जिल्ह्यासाठी अद्यापही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही, यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "माझी उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण मेहनतीने काम करत आहोत. यश मिळणारच आहे. कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किती फिरत आहेत, किती मेहनत करत आहेत. 

महायुतीत आपसात खूप भांडण सुरू आहे -यांचे (महायुती) आपसात खूप भांडण सुरू आहे. ते होऊ द्या आम्हाला काही देणे घेणे नाही. त्यांनी कुणीही माणूस दिला, तरी तो खूप मोठा माणूस आहे, असे समजून त्याला पाडायचे. म्हणजे शक्ती निर्माण होते. आपण नगण्य आहे असे म्हटले तर तो ओव्हर कॉन्फिडन्स होतो. तो ओव्हर कॉन्फिडन्स न होता त्याला पाडायचे. यासाठी सर्वशक्ती एत्रित आली आहे."    

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेPoliticsराजकारणMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना