"गोली मार दूँगा!"; जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी हडपून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:40 IST2026-03-09T12:35:23+5:302026-03-09T12:40:23+5:30

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याची जमिनीच्या विक्रीत १.३३ कोटींची फसवणूक; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar: Retired Police Officer Cheated of Rs 1.33 Crore in Land Deal; 6 Booked | "गोली मार दूँगा!"; जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी हडपून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला धमकी

"गोली मार दूँगा!"; जमिनीच्या व्यवहारात दीड कोटी हडपून सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला धमकी

छत्रपती संभाजीनगर : १८.७ गुंठे जमिनीची दोन कोटींमध्ये विक्री करण्याच्या व्यवहारात सहा जणांच्या टोळक्याने सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांच्या मित्रांची तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात ७ मार्चला गुन्हा नाेंदविला आहे.

आरोपींमध्ये शेख इरफान शेख शफीक, त्याचा भाऊ शेख सलमान शेख शफीक, त्याची आई गौसिया बेगम शेख शफीक, त्याचे वडील शेख शफीक उर्फ शेख साहब (सर्व रा. सलमान हॉल, दिल्ली गेटजवळ), शेख जमील शेख गुलाम रसूल (३४, रा. रोजेबाग ईदगाह झोपडपट्टी) आणि शेख इम्रान शेख गफ्फार (रा. कैसर कॉलनी) या सहा जणांचा समावेश आहे. यातील जमील हा मुख्य आरोपी इरफानचा नोकर आहे. शहर पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले गोरख चव्हाण (रा. एकतानगर, जटवाडा रोड) यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मित्र यासीन खान महेमूद खान याने आरोपी इरफानची भेट घालून देत १८.७ गुंठे जमिनीचा व्यवहार २ कोटी रुपयांत ठरविला होता. त्यात चव्हाण यांचे २० लाख अडकले आहेत. उर्वरित सर्व रक्कम यासीन यांची आहे. यासीन हे जुन्या दुचाकी खरेदी - विक्रीचा व्यवसाय करतात. या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

धनादेश दिले पण वटलेच नाहीत
फेब्रुवारी २०२४मध्ये १ कोटी ३३ लाख रुपये दिल्यानंतरही आरोपी इरफान शेखसह त्याच्या सहकाऱ्यांनी जमिनीचे खरेदीखत करून दिले नाही. त्यामुळे २३ जुलै २०२४ रोजी चव्हाण आणि यासीन यांनी १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर रजिस्टर नोटरी करून घेतली. त्यात व्यवहाराबाबत आणि दिलेल्या रकमेबाबत उल्लेख आहे. त्यानंतर आरोपी इरफानने फिर्यादींना वेगवेगळ्या रकमांचे आणि तारखांचे धनादेश दिले. मात्र, ते धनादेश संबंधित तारखांना वटले नाहीत. काही धनादेश तर बंद असलेल्या बँक खात्यांचे दिले होते.

ताबा घेण्यास जाताच शिविगाळ
आरोपींनी चव्हाण आणि यासीन यांना सलमान हॉल, बिल्डिंग क्र. २मधील दुकान क्र. ३ आणि ४ देण्याचा शब्द दिल्यावर यासीन हे दुकानाचा ताबा घेण्यासाठी गेले. तेव्हा आरोपी इरफानचा वडील शफीक याने त्यांना शिवीगाळ केली. तसेच, कंबरेची बंदूक काढत फिरसे इधर आया तो गोली मार दुँगा, असे म्हणून ये खिलोना नहीं है, इसका लायसन है मेरे पास, असे सुनावले. तसेच, इरफान हा चोरो का सरदार है, उसको तुम्हारे लिए ही छोडा है, मेरा सलमान बाहार है, वो यहा रहता तो तुम पैरो पर वापस नही जाते, असे म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title : "गोली मार दूँगा!": जमीन सौदे में धोखाधड़ी, सेवानिवृत्त पुलिसकर्मी को धमकी।

Web Summary : एक जमीन सौदे में सेवानिवृत्त पुलिस अधिकारी और उसके दोस्त से 1.33 करोड़ रुपये की धोखाधड़ी हुई। मुख्य संदिग्ध इरफान और उसके साथियों ने बाउंस चेक जारी किए और विरोध करने पर बंदूक से धमकी दी।

Web Title : "I'll shoot you!": Retired cop threatened over land deal fraud.

Web Summary : A retired police officer and his friend were defrauded of ₹1.33 crore in a land deal. The main suspect, Irfan, and his accomplices issued bounced checks and threatened them with a gun when confronted.