छत्रपती संभाजीनगर / दौलताबाद: दौलताबाद परिसरातील आसेगाव शिवारात गुरुवारी एका ५५ ते ६० वर्षीय वृद्धेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. सुरुवातीला ओळख पटत नसलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मृत वृद्धेचे सुस्पष्ट छायाचित्र तयार केले. दरम्यान, शवविच्छेदनात ही हत्याच असल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्येचा तपास आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे.
काय घडली घटना?धुळे-सोलापूर महामार्गावरील माळीवाडा-आसेगाव मार्ग परिसरात ओढ्याच्या शेजारी ही महिला बेशुद्ध अवस्थेत असल्याचे शेतकरी संतोष कांबळे यांना दिसले. पोलीस निरीक्षक रेखा लोंढे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासणीत महिलेचा कान फाटलेला दिसून आल्याने सोन्याचे दागिने ओरबाडून काढल्याचा आणि तोंड दाबून श्वास रोखल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालातही तोंड व गळा दाबून हत्या झाल्याचे आता उघड झाले आहे.
एआय (AI) तंत्रज्ञानाचा असा झाला वापरमृत महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या सूचनेनुसार, सायबर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या पथकाने एआयच्या मदतीने मृतदेहाचे योग्य आणि ओळखता येईल असे छायाचित्र तयार केले. हे छायाचित्र आसपासच्या सर्व जिल्हा पोलिसांना पाठवून ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुन्हेगारांनी ही घटना केवळ लूटमार भासवण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे.
मृत वृद्धेची ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहनअंदाजे वय: ५५ ते ६० वर्षे. वर्णन: उंची ४.५ ते ५ फूट, मध्यम बांधा, गोरा वर्ण, काळे पांढरे केस.ओळख खूण: उजव्या पायात काळा धागा, हातात पांढऱ्या रंगाची व तुळशीची माळ, बोटात अंगठी.संपर्क: अशी महिला ओळखीची असल्यास तातडीने दौलताबाद पोलिसांशी संपर्क साधावा.
Web Summary : A 55-60 year old woman's body was found near Daulatabad. Police used AI to create an image for identification after discovering her murder during the postmortem. The investigation is ongoing, focusing on robbery as a possible motive.
Web Summary : दौलताबाद के पास एक 55-60 वर्षीय महिला का शव मिला। पोस्टमार्टम में हत्या की पुष्टि होने पर पुलिस ने पहचान के लिए एआई का इस्तेमाल किया। जांच जारी है, लूटपाट को संभावित मकसद माना जा रहा है।