छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांची अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:10 IST2025-10-18T17:05:12+5:302025-10-18T17:10:01+5:30
बहुचर्चित गुन्हे शाखेच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांची अधिकाऱ्यांना दिवाळी भेट, पोलिस निरीक्षकांच्या बदल्या
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्तांनी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करत काहींना दिवाळी भेट दिली. यात बहुचर्चित तसेच शहराची गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्यासह शहरातील एकूण १५ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, दोन निरीक्षकांचा तात्पुरता पदभार कायम ठेवण्यात आला आहे.
तत्कालिन पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या बदलीनंतर गुन्हे शाखेचे प्रभारीपदी रिक्त झाले होते, तेव्हापासून अनेक अधिकाऱ्यांनी या पदासाठी मुंबईपर्यंत जोर लावला. त्याशिवाय, शहरातील महत्त्वाच्या ठाण्याचा पदभार मिळण्यासाठी अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली होती. शुक्रवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी अखेर या बदलीबाबत निर्णय घेत १५ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश जारी केले. यानंतर सहायक पाेलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांची देखील खांदेपालट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकारी - कोठून (पोलिस ठाणे /विभाग) - कुठे (पोलिस ठाणे /विभाग)
गजानन कल्याणकर - एमआयडीसी सिडको - गुन्हे शाखा
गीता बागवडे - अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग - एमआयडीसी सिडको
शिवचरण पांढरे - सायबर पोलिस ठाणे - वाळुज
अतुल येरमे - उस्मानपुरा - सिडको
सोमनाथ जाधव - नियंत्रण कक्ष - सायबर पोलिस ठाणे
संग्राम ताटे - नियंत्रण कक्ष - उस्मानपुरा
सुनिता मिसाळ - हर्सुल - भरोसा सेल
स्वाती केदार - विशेष शाखा - हर्सुल
राजेंद्र सहाणे - वाळुज - पोलिस आयुक्त यांचे वाचक
श्रीनिवास रोयलवाल - नियंत्रण कक्ष - सिटीचौक (दुय्यम निरीक्षक)
तेजश्री पाचपुते - भरोसा सेल - नियंत्रण कक्ष
शिवाजी तावरे -नियंत्रण कक्ष - पोलिस कल्याण
राजेश मयेकर - नियंत्रण कक्ष - एटीबी, एटीसी
कुंदनकुमार वाघमारे - सिडको - नियंत्रण कक्ष
नरेंद्र पाडळकर - नियंत्रण कक्ष - विशेष शाखा (पासपोर्ट)
आघाव यांच्याकडे वाहतूकचा अतिरिक्त भार
सद्या विशेष शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे सिडको वाहतूक शाखेच्या प्रभारीपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे, तर काही दिवसांपासून तात्पुरता पदभार असलेल्या जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार व जिन्सीचे शिवाजी बुधवंत यांना त्याच ठाण्यात पूर्णवेळ प्रभारीपद देण्यात आले आहे.