छ. संभाजीनगरमध्ये वाइनशॉपसमोरच मद्यपींची बैठक, हटकणाऱ्या पोलिसांवर दारू फेकून हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:43 IST2026-02-19T12:33:22+5:302026-02-19T12:43:18+5:30

भररस्त्यात राडा! रस्त्यावर दारू पिण्यास मज्जाव केला म्हणून पोलिसांवरच हात टाकला.

Chhatrapati Sambhajinagar News: Two Arrested for Attacking Police and Throwing Alcohol Outside Wine Shop | छ. संभाजीनगरमध्ये वाइनशॉपसमोरच मद्यपींची बैठक, हटकणाऱ्या पोलिसांवर दारू फेकून हल्ला

छ. संभाजीनगरमध्ये वाइनशॉपसमोरच मद्यपींची बैठक, हटकणाऱ्या पोलिसांवर दारू फेकून हल्ला

छत्रपती संभाजीनगर : वाइनशॉपमधून दारू घेऊन दुकानासमोरच मद्यपींनी बैठक बसवली. ही बाब कळताच, त्यांना हटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच दोघांनी मारहाण करून त्यांच्या अंगावर दारू फेकण्यापर्यंत मजल मारली. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडलेल्या घटनेत सुनील श्यामराव धनेधर व रोहित भानुदास इंगळे (दोघे रा.इंदिरानगर) यांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

वाइनशॉपसमोर आणि आसपासच्या परिसरातच मद्यपींच्या दारू पिण्याबाबत सातत्याने नागरिकांकडून तक्रारी होत आहेत. दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वी याबाबत चिंता व्यक्त केली होती. १६ फेब्रुवारी रोजी पुंडलिकनगरचे अंमलदार प्रशांत नरोडे, अमोल बक्कल, विनोद गायकवाड हे गस्तीवर होते. सायंकाळी ६ वाजता शिवाजीनगरमधून गस्त घालत असताना क्रिस्टल वाइन शॉपसमोर रस्त्यावरच आरोपी धनेधर व इंगळे दारू पित होते. पोलिसांनी त्यांना दारू पिण्यास मज्जाव करून निघून जाण्यास सांगितले. त्यांनी मात्र पोलिसांनाच शिवीगाळ केली. धक्काबुक्की करून ‘काय करायचे ते कर,’ असे म्हणत एकाने पोलिसांच्या अंगावर दारू फेकली. इंगळेने पोलिसांवर हात उगारण्याचा प्रयत्न केला. धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. पोलिसांनी बळाचा वापर करून दोघांना ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून साहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे यांनी दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केल्याचे कऱ्हाळे यांनी सांगितले.

रस्त्यावरच बैठका, नागरिक, रहिवासी त्रस्त
शिवाजीनगर, पुंडलिनगरमधील वाइनशॉपसह शहरातील बीडबायपास, सिडको बस स्थानक, माेंढा उड्डाणपूल येथील वाइनशॉप परिसरात मद्यपी बैठक बसवतात. क्रिस्टल वाइनशॉपजवळच खाद्यपदार्थांचे दुकाने असून, तेथेच मद्यपींना ग्लास व खाण्याचे पदार्थ मिळत असल्याने तेथेच दारूचे सेवन केले जाते. या शॉपजवळच रहिवासी सोसायटीचे प्रवेशद्वार असून, देवळाई, शिवाजीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा रोज नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा वाहन चालकांना अडविण्याचे प्रकारही येथे घडतात.

Web Title : छत्रपति संभाजीनगर में वाइन शॉप के पास पुलिस पर शराबी का हमला

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में, दो शराबियों ने शराब की दुकान के पास शराब पीने से रोकने की कोशिश करने वाले पुलिस अधिकारियों पर हमला किया। आरोपियों ने पुलिस को गाली दी, उन पर शराब फेंकी और जान से मारने की धमकी दी। दोनों को गिरफ्तार कर जेल भेज दिया गया है।

Web Title : Drunkards Attack Police Near Wine Shop in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : In Chhatrapati Sambhajinagar, two drunkards attacked police officers who tried to stop them from drinking near a wine shop. The accused verbally abused the police, threw alcohol on them, and threatened them. Both have been arrested and sent to jail.