शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात ५९२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; सर्वपक्षीय अहंकाराला मतदारांचा लगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:56 IST

राष्ट्रवादीच्या ७८ पैकी तब्बल ७४ उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवण्यात अपयश

-ज्ञानेश्वर भाले 
छत्रपती संभाजीनगर :
महापालिका निवडणुकीने केवळ सत्तासंघर्षच नाही, तर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीच्या धोरणांची परीक्षा घेतली. या महासंग्रामात मतदारांनी थेट कौल देत अनेक पक्षांना आरसा दाखवल्याचे निकालातून समोर आले. यात सर्वाधिक फटका बसला तो राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवारांना. त्यांनी उभ्या केलेल्या ७८ उमेदवारांपैकी तब्बल ७४ उमेदवारांना त्यांचे डिपॉझिटही वाचवता आले नाही. यासह इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे पुढे आले.

बहुतांश पक्षांनी संघटनात्मक गणिते, गटबाजी आणि वरून लादलेले चेहरे या निवडणुकीत मतदारांसमोर ठेवले. परिणामी, पक्षचिन्ह असूनही संबंधित उमेदवारांना मतदारांचा विश्वास मिळवता आला नाही. ही बाब स्थानिक पातळीवरील पक्ष नेतृत्वाच्या अपयशावर थेट बोट ठेवणारी आहे. अपक्ष उमेदवारांची झालेली दयनीय अवस्था आणि ‘नोटा’ला मिळालेला प्रतिसाद हे मतदारांची अस्वस्थता यातून दिसली. त्यामुळे महापालिकेच्या महासंग्रामात राष्ट्रवादी (अजित पवार), राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, उद्धवसेना, शिंदेसेना, भाजप आणि एमआयएमच्या उमेदवारांनासुद्धा याचा फटका बसला. उमेदवारांची डिपॉझिट जप्ती म्हणजे मतदारांचा संताप असून, पक्षीय अहंकाराला लगाम घालणारा हा महापालिकेचा निकाल ठरला.

९७४ पैकी ५९२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
या महापालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यात एकूण ९७४ उमेदवारांपैकी ५९२ जणांचे डिपॉझिट जप्त झाले.

राष्ट्रवादीला (अजित पवार) आत्मपरीक्षणाची वेळ
या निवडणुकीत राष्ट्रवादीने (अजित पवार) उभ्या केलेल्या ७८ उमेदवारांपैकी तब्बल ७४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. संबंधित आकडा पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पकड, संघटनात्मक ताकद आणि उमेदवार निवडीच्या निकषांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहे.

राष्ट्रीय पक्षांनाही धक्का
काँग्रेसच्या ७१ पैकी ५६, भाजपच्या १५ उमेदवारांनाही फटका बसला. उद्धवसेनेच्या ४७ तर शिंदेसेनेचे ३७ उमेदवार डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. सत्ता, संघटना आणि प्रचार असूनही मतदारांचा विश्वास मिळवण्यात संबंधित पक्ष अपयशी ठरल्याचे या निवडणुकीतून पुढे आले.

वंचित, एमआयएमची मर्यादा उघड
वंचित बहुजन आघाडीच्या ६२ पैकी ४५, तर एमआयएमच्या ४९ पैकी ७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. या दोन्ही पक्षांचा मात्र, काही प्रभागात प्रभाव दिसून आला.

अपक्षांना पूर्ण अपयश
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची अवस्था सर्वाधिक दयनीय ठरली. २१३ पैकी २१० अपक्ष उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. विशेष म्हणजे गत निवडणुकीत (२०१५) तब्बल १८ नगरसेवक अपक्ष म्हणून महापालिकेच्या सभागृहात होते. मात्र, २०२६ च्या निवडणुकीत एकाही अपक्ष उमेदवाराला आपला प्रभाव पाडता आला नाही.

‘नोटा’चा इशारा
मनपाच्या या रणसंग्रामात तब्बल ६५,८७७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. संबंधित आकडा मतदारांतील उमेदवारांविषयी असलेली नाराजी, पर्यायांचा अभाव आणि पक्षीय राजकारणाबाबत वाढत असलेली उदासीनता दर्शवणारा ठरला.

लहान पक्षांचा सफाया
बसप, रासप, आप, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन सेना, भापक, मापक, आरपीआय (डी) आदी पक्षांनी उभ्या केलेल्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. महापालिकेच्या राजकारणात या पक्षांची मर्यादा पुन्हा एकदा निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केली.

पक्षनिहाय उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
पक्ष --- लढलेल्या जागा --- डिपॉझिट जप्त

रा. (अजित पवार) --- ७८ --- ७४
रा. (शरद पवार) --- २२ --- २०
काँग्रेस --- ७१ --- ५६
वंचित --- ६२ --- ४५
उद्धवसेना --- ९६ --- ४८
शिंदेसेना --- ९६ --- ३७
एमआयएम --- ४९ --- ७
भाजप --- ९२ --- १५
अपक्ष --- २१३ --- २१०

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar: Voters reject party arrogance, forfeit 592 candidates' deposits.

Web Summary : Sambhajinagar's election exposed party failures. Many candidates, especially from NCP (Ajit Pawar), lost deposits. Voters favored NOTA, signaling discontent. Independent candidates fared poorly. The results highlight voter frustration and a rejection of party arrogance.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६