छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका: स्थायी समिती सदस्यांची घोषणा; पाहा १६ सदस्यांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:16 IST2026-03-05T17:16:10+5:302026-03-05T17:16:58+5:30

मनपा विशेष सभा: स्थायी समितीवर भाजपचे ८, एमआयएमचे ४ तर शिवसेनेचे ३ सदस्य; राजकीय समीकरणे स्पष्ट

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation: Final List Out! Meet the 16 New Members of Sambhajinagar Municipal Standing Committee | छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका: स्थायी समिती सदस्यांची घोषणा; पाहा १६ सदस्यांची यादी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका: स्थायी समिती सदस्यांची घोषणा; पाहा १६ सदस्यांची यादी

छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विशेष बैठकीत (सभा) ५ मार्च २०२६ रोजी स्थायी समिती आणि विविध पाच विशेष समित्यांच्या सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या समितीमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजपा) आपले वर्चस्व राखले असून, एकूण १६ सदस्यांपैकी ८ सदस्य एकट्या भाजपचे आहेत.

पक्षनिहाय बलाबल:
स्थायी समितीच्या निवडीमध्ये भाजपने ८ जागांवर आपले सदस्य नियुक्त केले आहेत. त्यानंतर एमआयएम (AIMIM) पक्षाचे ४ सदस्य समितीवर असतील. सत्ताधारी शिवसेनेचे २ आणि शिवसेना (उबाठा) गटाचा १ सदस्य अशा प्रकारे शिवसेनेचे एकूण ३ प्रतिनिधी या समितीत असतील. वंचित बहुजन आघाडीला देखील या समितीमध्ये १ जागा मिळाली आहे.

स्थायी समिती सदस्यांची नावे:
१. कमलाबाई रामचंद्र नरोटे (भा.ज.पा.)
२. राजगौरव हरिदास वानखेडे (भा.ज.पा.)
३. सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी (भा.ज.पा.)
४. रवि साहेबराव कावडे (भा.ज.पा.)
५. अनिल श्रीकिशन मकरिये (भा.ज.पा.)
६. अर्चना शैलेंद्र निळकंठ (भा.ज.पा.)
७. माधुरी मिलींद देशमुख (भा.ज.पा.)
८. अप्पासाहेब विनायकराव हिवाळे (भा.ज.पा.)
९.  खान अब्दुल मतीन (AIMIM)
१०. मेराज खान जलील खान (AIMIM)
११. पठाण मजहर पठाण अय्युब (AIMIM)
१२. खान अल्मास खानम अमजद (AIMIM)
१३. श्वेता सुमित त्रिवेदी (शिवसेना)
१४. राजु भगनंसिंग राजपूत (शिवसेना)
१५. सचिन सूर्यकांत खैरे (शिवसेना - उबाठा)
१६. अमित भूईंगळ (वंचित बहुजन आघाडी)

या निवडीमुळे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे राहणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता लवकरच स्थायी समिती सभापतीची निवड पार पडणार असून, त्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title : छत्रपति संभाजीनगर महानगरपालिका: स्थायी समिति सदस्यों की घोषणा

Web Summary : छत्रपति संभाजीनगर की स्थायी समिति में भाजपा का दबदबा, 8 सदस्य। एआईएमआईएम के 4, शिवसेना के 3, और वीबीए का 1 सदस्य। चुनाव शहर के वित्त पर नियंत्रण निर्धारित करते हैं। समिति अध्यक्ष का चुनाव बाकी है।

Web Title : Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Announces Standing Committee Members

Web Summary : BJP dominates Chhatrapati Sambhajinagar's Standing Committee with 8 members. AIMIM has 4, Shiv Sena 3, and VBA 1. Elections determine control of the city's finances. Committee chairperson selection is awaited.