शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

टँकरच्या धडकेने मजुराच्या छातीतून आरपार घुसला रॉड, जागीच मृत्यू; छ. संभाजीनगरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:50 IST

झाल्टा फाट्यावर भीषण अपघात, बेजबाबदार टँकर चालकासह निष्काळजीपणा करणाऱ्या सुपरवायझरवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर साइड इफेक्ट (पांढरे पट्टे) मारण्याचे काम करताना सुसाट गॅस टँकरने (एमएच २७ - डीटी ४५०६) कामगाराला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भयावह होती की यात कामगार पुंडलिक निवृत्ती नवगिरे (४०, रा. पिंपळगाव पांढरी) हे पट्टे मारणाऱ्या मशीनवर जाऊन पडून त्याचा लोखंडी रॉड त्यांच्या छातीतून आरपार बाहेर पडला. यात नवगिरे जागीच मृत्युमुखी पडले. केंब्रिज चौक झाल्टा चौक रस्त्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता ही दुर्घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, झाल्टा परिसर व परिसरातील सर्व महामार्गांवर सध्या साइड इफेक्ट पट्टे मारण्याचे काम सुरू आहे. एका खासगी कंपनीकडून कंत्राट घेऊन ठेकेदारामार्फत हे काम सुरू आहे. पुंडलिक नवगिरे हे मशीनद्वारे रस्त्यावर पट्टे मारत होते. ११ वाजेच्या सुमारास पुंडलिक कामात व्यस्त असताना मागून सुसाट आलेल्या टँकरचालकाने थेट त्यांच्या अंगावर जात उडवले. यात पुंडलिक काही अंतरावर असलेल्या मशीनवर कोसळून मशीनचा लाेखंडी रॉड त्यांच्या छातीत घुसून पाठीतून बाहेर निघाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलिसांनी धाव घेत पुंडलिक यांचा मृतदेह मिनी घाटीच्या शवविच्छेदनगृहात नेला.

कामगारांच्या सुरक्षेचे काय?अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमून तणाव निर्माण झाला होता. पुंडलिक काम करीत असताना संबंधित कंपनी व ठेकेदाराने सुरक्षेच्या कुठल्याच उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यांच्या मदतीला जबाबदार अधिकारी, सहकारीदेखील नियुक्त केला नाही. त्यांच्या बेजबाबदारपणा व हलगर्जीपणामुळेच पुंडलिक यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे. नवगिरे हे कुटुंबात कमावणारे एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

यांच्यावर गुन्हा दाखलमृत पुंडलिक यांचे भाऊ विठ्ठल नवगिरे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक यांच्या मृत्यूस जबाबदार टँकर चालक, जी.एन.आय. कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर व सुपरवायझरवर चिकलठाणा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक समाधान पवार अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tanker Kills Worker: Rod Pierces Chest, Instant Death in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : A speeding tanker fatally struck a road worker in Chhatrapati Sambhajinagar. The impact forced a metal rod through his chest, killing him instantly. Negligence in safety measures is alleged, leading to a police investigation and filing of charges.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात