शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण ‘कडा’ अॅक्शन मोडवर; विक्रमी २०० कोटी पाणीपट्टी वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 15:45 IST

एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वसुली; जायकवाडी प्रकल्प कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर मनपाला पाणीपट्टीच्या थकबाकीसह ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांचे बील दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात कडा, छत्रपती संभाजीनगर सर्कल कार्यालयांतर्गत जायकवाडी प्रकल्पासह विविध धरणांतून बिगर सिंचन वापरासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुल्कापोटी यंदा आतापर्यंत २०० कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती आहे. यात सर्वाधिक ९९ कोटी ९८ लाख रुपये पाणीपट्टीचा वाटा परळी थर्मल पॉवरने जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत, छत्रपती संभाजीनगर कडा कार्यालयाचा समावेश होतो. या कार्यालयाच्यावतीने धरणांतील पाणी व्यवस्थापन आणि दुरुस्तींची कामे करण्यात येतात. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी, तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना पाण्याचा पुरवठा याच कार्यालयाच्या परवानगीने करण्यात येतो. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचा सर्वाधिक वापर सिंचनासाठी आणि बिगर सिंचनाकरिता देखील केला जातो. एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण अशा शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांना पाटबंधारे विभागाकडून पाणी पट्टीची देयके देण्यात येतात.

३१ मार्चपर्यंत आणखी वसुलीची शक्यताकडा कार्यालयाला यंदा ८८ कोटी रुपयांच्या पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट वरिष्ठ कार्यालयाने दिले होते. ही वसुली करण्यासाठी कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी संबंधित पाणी वापरकर्त्यांना, संस्थांना नोटीसा बजावल्या होत्या. शिवाय अधिकाऱ्यांना वसुलीसाठी संबंधितांच्या भेटी घेण्याचे निर्देश दिले होते. याचे सकारात्मक पडसाद दिसू लागले आहे. कडा कार्यालयास मिळालेल्या उद्दिष्टापेक्षा अडीचपट अर्थात दोनशे कोटी रुपयांची वसुली यंदा आतापर्यंत झाली आहे. ३१ मार्चपर्यंत आणखी ही रक्कम वाढणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

परळी थर्मल पाॅवरकडे ५०० कोटींची थकबाकी....बीड जिल्ह्यातील परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनकडे पाणीपट्टीची तब्बल ५०० कोटी रुपयांची थकबाकी होती. ही थकबाकी तात्काळ द्यावी अन्यथा पॉवर स्टेशनचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी परळी थर्मल पाॅवरने तब्बल ९९ कोटी ९८ हजार रुपये कडा कार्यालयाकडे जमा केल्याची माहिती आहे.

महापालिकेसोबत लवकरच बैठकजायकवाडी प्रकल्प कार्यालयाने छत्रपती संभाजीनगर मनपाला पाणीपट्टीच्या थकबाकीसह ६४ कोटी ९७ लाख ९६ हजार रुपयांचे बील दिले आहे. यासोबतच मनपाने नवीन जॅकवेलची स्थापना जायकवाडी प्रकल्पात केली आहे. याबद्दल २०१ कोटी १३ लाख १८ हजार रुपयांची स्वतंत्र मागणी करण्यात आली. ही रक्कम अदा करण्यासाठी जायकवाडी प्रकल्प कार्यालयाने पाणी बंद करण्याची नोटीस दिली होती. या नोटीसला उत्तर देताना महापालिकेने एक बैठक आयोजित करुन निर्णय घेऊ असे कळविले.

टॅग्स :Waterपाणीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडा