सुरतहून छ. संभाजीनगरात 'नशेचा' ओघ सुरूच; तस्कर २४०० गोळ्यांसोबत रंगेहाथ सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:30 IST2026-03-25T13:30:20+5:302026-03-25T13:30:50+5:30

अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची कारवाई, २४०० गोळ्या, १४ पातळ औषधींच्या बाटल्या जप्त

Chhatrapati Sambhajinagar Drug Bust: Anti-Narcotics Task Force Seizes 2400 Pills; Surat Link Exposed Again | सुरतहून छ. संभाजीनगरात 'नशेचा' ओघ सुरूच; तस्कर २४०० गोळ्यांसोबत रंगेहाथ सापडला

सुरतहून छ. संभाजीनगरात 'नशेचा' ओघ सुरूच; तस्कर २४०० गोळ्यांसोबत रंगेहाथ सापडला

छत्रपती संभाजीनगर : सातत्याने अमली पदार्थांच्या विक्रेत्यांवर कारवाई होऊनही शहरात नशेच्या गोळ्या व पातळ औषधींची विक्री सुरूच आहे. पाच दिवसांपूर्वी नगरनाक्यावर अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या तावडीतून पळालेल्या सय्यद अझहर सय्यद अकबर (रा. चांदमारी, छावणी) याला पथकाने मंगळवारी अटक केली, तर घाटी परिसरात सोमवारी रात्री गोळ्या, पातळ औषधींचा साठा विकण्यासाठी आलेला अझहरच्याच टोळीचा सदस्य तौफिक रशीद अली (२४, रा. चांदमारी, कश्मीर मोहल्ला, छावणी) हा पोलिसांच्या हाती लागला आहे.

टास्क फोर्सच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना घाटी रुग्णालय परिसरात अमली पदार्थांचा साठा पेडलरला देण्यासाठी तरुण येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. बागवडे, सहायक निरीक्षक दीपाली पाटील यांनी घाटी परिसरात सापळा रचला. रात्री १ वाजता एका मोपेडवर संशयित येताच त्याला पकडल्यानंतर तौफिक अली असल्याचे समोर आले. त्याच्या बॅगमध्ये प्रत्येकी १० गोळ्या असलेल्या २४०० गोळ्यांच्या २४० स्ट्रिप व १४ पातळ औषधींच्या बाटल्या आढळल्या. त्याच्यावर बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार नितीन जाधव, रवींद्र साळवे, कैलास गाडेकर, हरीश मुंढे, अतुल तुपे, राहुल काळे, ज्योती कीर्तिकर, आम्रपाली सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

किमान १५ जणांची टोळी सक्रिय
अमली पदार्थांच्या गुन्ह्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार अंधा फिरोजचा भाऊ सय्यद अझहर सय्यद अकबर (२५) हा शनिवारी सकाळी नगरनाक्यावर ट्रॅव्हल्समधून उतरताच पोलिसांना पाहून २ हजार गोळ्या, ११८ पातळ औषधींचा साठा फेकून देत पळाला होता. पथकाने त्याला मंगळवारी अटक केली. अंधा फिरोज त्याच्या परिसरातील अशा जवळपास तिशीतल्या १५ तरुणांची टोळी चालवत असल्याचेही चौकशीतून समोर आले.

पुन्हा सुरत कनेक्शन
सय्यद अझहर शनिवारी शहरात परतला. त्याच्या दोन दिवस आधी तौफिकने सुरतला जाऊनच हा साठा खरेदी करून शहरात आणला होता. यापूर्वी शहरात पकडल्या गेलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीत गुजरातमधील शहरांची नावे समोर आली आहेत.

 

Web Title : सूरत से छत्रपति संभाजीनगर में नशे का प्रवाह जारी; तस्कर गिरफ्तार

Web Summary : कार्रवाई के बावजूद, छत्रपति संभाजीनगर में नशीली दवाओं की बिक्री जारी है। पुलिस ने सूरत से ड्रग्स आयात करने वाले गिरोह के दो लोगों को गिरफ्तार किया, हजारों गोलियां और तरल नशीले पदार्थ जब्त किए। एक ज्ञात अपराधी के भाई के नेतृत्व में, गिरोह में लगभग पंद्रह युवा शामिल हैं।

Web Title : Surat Drug Flow Continues to Chhatrapati Sambhajinagar; Smuggler Arrested

Web Summary : Despite crackdowns, drug sales persist in Chhatrapati Sambhajinagar. Police arrested two men from a gang importing drugs from Surat, seizing thousands of pills and liquid narcotics. The gang, led by a known criminal's brother, involves approximately fifteen young individuals.