सोशल मीडियावर मैत्री करताना विचार करा; छ. संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलास लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:54 IST2026-03-25T18:54:21+5:302026-03-25T18:54:26+5:30

एमआयडीसी सिडको पोलिसांकडून एक संशयित ताब्यात, दुसरा पसार

Chhatrapati Sambhajinagar Crime: Minor Lured via Instagram Friendship, Robbed of Gold and Mobile; One Suspect Detained | सोशल मीडियावर मैत्री करताना विचार करा; छ. संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलास लुटले 

सोशल मीडियावर मैत्री करताना विचार करा; छ. संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलास लुटले 

छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर मैत्री झाली. इन्स्टाग्रामवरील मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला दोघांनी मारहाण केली. त्याचा मोबाइल, कानातली सोन्याची बाळी व हातातील चांदीचे ब्रेसलेट लुटले. २२ मार्च रोजी रात्री ११:०० वाजता धुत रुग्णालय परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून, दुसरा संशयित पसार आहे.

उस्मानपुऱ्यात राहणाऱ्या १७ वर्षीय आनंदची सार्थक नामक इन्स्टाग्राम प्रोफाइल असणाऱ्याशी ओळख झाली होती. २२ मार्च रोजी सार्थकने त्याला क्रांती चौकात त्याचा वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने भेटण्यास बोलावले होते. क्रांती चौकात भेटल्यानंतर सार्थक व अन्य एका अल्पवयीन मुलाने त्याला पुन्हा धुत रुग्णालयाजवळ नेले. तेथे जाताच दोघांनी मिळून आनंदला मारहाण सुरू केली. 'तू सार्थकला इन्स्टाग्रामवर शिविगाळ का करतो', असे म्हणत कानातील सोन्याची १ ग्रॅमची बाळी, मोबाइल व चांदीचे ब्रेसलेट हिसकावून घेतले. त्याच्या दुचाकीचे स्वीच फोडले आणि सीट चाकूने फाडून पसार झाले.

सोशल मीडियावरील प्रसिध्दीचा हव्यास
सार्थक व त्याच्या सहकाऱ्याला इन्स्टाग्रामवर सतत सक्रिय राहून प्रसिध्द होण्याचा सोस आहे. सार्थकसह त्याचा अल्पवयीन साथीदार महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यातील १७ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले, तर सार्थकचा शोध सुरू असल्याचे अंमलदार संतोष सोनवणे यांनी सांगितले.

Web Title : सोशल मीडिया पर दोस्ती करने से पहले सोचें: संभाजीनगर में नाबालिग लूटा गया

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक नाबालिग को इंस्टाग्राम पर दोस्त से जन्मदिन मनाने के लिए मिलने के बाद लूट लिया गया। पीड़ित पर हमला किया गया, और उसका फोन, सोने की बाली और चांदी का ब्रेसलेट चुरा लिया गया। पुलिस ने एक संदिग्ध को गिरफ्तार किया है, जबकि दूसरा फरार है।

Web Title : Think Before Friending on Social Media: Minor Robbed in Sambhajinagar

Web Summary : A minor was robbed in Chhatrapati Sambhajinagar after meeting an Instagram friend for a birthday celebration. The victim was assaulted, and his phone, gold earring, and silver bracelet were stolen. Police have apprehended one suspect, while the other remains at large.