मद्यधुंद होमगार्डचं डोकं फिरलं! भरवस्तीत हवेत गोळीबार करून स्वतःला घरात कोंडून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:05 IST2026-02-28T12:04:12+5:302026-02-28T12:05:11+5:30

मध्यरात्री गोळीबाराच्या आवाजाने छत्रपती संभाजीनगर हादरलं!

Chhatrapati Sambhajinagar Crime: Drunk Home Guard Arrested for Firing in Air with Licensed Pistol | मद्यधुंद होमगार्डचं डोकं फिरलं! भरवस्तीत हवेत गोळीबार करून स्वतःला घरात कोंडून घेतलं

मद्यधुंद होमगार्डचं डोकं फिरलं! भरवस्तीत हवेत गोळीबार करून स्वतःला घरात कोंडून घेतलं

छत्रपती संभाजीनगर : छावणी ठाण्यात कार्यरत होमगार्डने मद्यधुंद अवस्थेत घराबाहेर येत हवेत गोळी झाडल्याचा प्रकार शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेदहा ते अकराच्या सुमारास निसर्ग कॉलनी भागात उघडकीस आला.

संबंधित गोळीबार परवानाधारक पिस्तुलातून केल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी दिली. प्रसन्नजित मनोहर कांबळे (४२, रा. निसर्ग कॉलनी), असे आरोपीचे नाव असून, त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याचेही सपोनि जाधव यांनी सांगितले. मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, कांबळे हा होमगार्ड म्हणून छावणी ठाण्यात कार्यरत आहे. शुक्रवारी रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घराबाहेर आला. रस्त्यावर येऊन त्याने हवेत परवानाधारक पिस्तुलातून गोळी झाडली. अचानक झालेल्या गोळीबारीच्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली. घटनेची माहिती छावणी पोलिसांना देण्यात आली. कांबळे याने गोळीबार केल्यानंतर घर आतून कुलूप लावून घेत बंद केले. सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घराच्या पत्र्यावरून आत शिरून पोलिसांनी गोळीबार करणारा होमगार्ड कांबळे याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. त्याचे पिस्तूल, परवाना सर्व जप्त करण्यात आले आहे.

Web Title : शराबी होमगार्ड ने गोली चलाई, खुद को घर में बंद किया

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में एक शराबी होमगार्ड ने अपनी लाइसेंसी पिस्तौल से हवा में गोली चलाई, जिससे दहशत फैल गई। पुलिस ने छत से घर में घुसकर प्रसन्नजीत कांबले को गिरफ्तार किया। हथियार जब्त कर लिया गया।

Web Title : Drunk Home Guard Fires Gun, Locks Himself in House

Web Summary : A drunk home guard in Chhatrapati Sambhajinagar fired his licensed pistol into the air, causing panic. Police arrested Prasannajit Kamble after entering his house through the roof. The weapon was seized.