'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 17:00 IST2026-03-14T16:58:31+5:302026-03-14T17:00:01+5:30

पैठणखेडा हत्याकांडाचा २४ तासांत उलगडा; दारूच्या नशेत मित्रानेच आवळला मित्राचा गळा

Chhatrapati Sambhajinagar Crime: Bidkin Police Solve Paithankheda Murder Case in 24 Hours; Friend Arrested for Strangling Friend Over Liquor Dispute | 'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड

'सोबत दारू पिले पण वाद जिवावर उठले!'; पैठणखेड्यात मित्रानेच केला मित्राचा अंत, थरार उघड

बिडकीन (ता. पैठण): तालुक्यातील पैठणखेडा येथे गुरुवारी नवनाथ नामदेव भादे (४०) या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा छडा लावण्यात बिडकीन पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले असून, दारूच्या नशेत झालेल्या वादातून सख्ख्या मित्रानेच गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विष्णू बापू घोंगार्डे (४५) याला अटक केली आहे.

दारूच्या नशेत उडाली ठिणगी
मयत नवनाथ आणि आरोपी विष्णू हे दोघे मित्र होते. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोघेही विष्णूच्या घरात मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात विष्णूने नवनाथचा गळा दाबला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजता मृतदेह आढळल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांची गतीने कारवाई
सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी, नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. सहायक निरीक्षक निलेश शेळके आणि संजीवन कदम यांच्या पथकाने संशयावरून विष्णूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मृताचा चुलतभाऊ संदीप भादे यांच्या फिर्यादीवरून विष्णू घोंगार्डेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----

 

Web Title : शराब के नशे में बहस बनी जानलेवा: पैठणखेड़ा में दोस्त ने दोस्त को मारा

Web Summary : पैठणखेड़ा में शराब के नशे में बहस के बाद एक व्यक्ति ने अपने दोस्त की हत्या कर दी। विष्णु घोंगार्डे ने झगड़े के दौरान नवनाथ भादे का गला घोंटने की बात कबूल की। परिवार के संदेह और त्वरित जांच के बाद पुलिस ने घोंगार्डे को गिरफ्तार कर लिया, जिससे 24 घंटे के भीतर अपराध का खुलासा हो गया।

Web Title : Drunken Argument Turns Deadly: Friend Kills Friend in Paithankheda

Web Summary : In Paithankheda, a man murdered his friend after a drunken argument escalated. Vishnu Ghongarde confessed to strangling Navnath Bhade during a fight. Police arrested Ghongarde following family suspicion and a swift investigation, revealing the crime within 24 hours.