अतिक्रमण काढताना विरोध करणे भोवले; MIM नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:00 IST2026-03-02T17:54:01+5:302026-03-02T18:00:02+5:30

व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर बदनामी केल्याचाही आरोप; शहागंजमधील 'त्या' राड्याप्रकरणी एमआयएम नेत्यांच्या अडचणी वाढल्या

Chhatrapati Sambhajinagar: Cases Filed Against MIM Corporators and Opposition Leader for Obstructing Encroachment Drive | अतिक्रमण काढताना विरोध करणे भोवले; MIM नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा दाखल

अतिक्रमण काढताना विरोध करणे भोवले; MIM नगरसेवकांसह विरोधी पक्षनेत्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : शहागंजात रस्त्यावर लावलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला विरोध केल्यामुळे एमआयएमच्या नगरसेवक, विरोधी पक्षनेत्यासह नगरसेवकांच्या नातेवाइकांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. याप्रकरणी महापालिका अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सविता सोनवणे यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार दिली.

आरोपींमध्ये एमआयएमचे नगरसेवक तथा मनपाचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद, नगरसेवक सय्यद ओसामा अब्दुल कादीर, काकासाहेब काकडे, फेरोज खान मोईनउद्दीन खान, मेराज खान जलील खान, मोहम्मद वाजेद जहागीरदार, सोहेल कुरेशी, मोहम्मद वसीम अलीम अहेमद, मतीन पटेल, मुन्शी पटेल, नगरसेविकेचे पती सलीम सहारा, नगरसेविकेचे जावई साबेर, नगरसेविकेचे पती अकिल अहेमद आणि नगरसेविकेचे वडील अमजद चाचू यांच्यासह इतर ३० ते ४० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. फिर्यादीनुसार २६ फेब्रुवारीला शहागंज भागात अतिक्रमण काढण्याची कारवाई मनपाच्या पथकाने केली. त्यानंतर २७ फेब्रुवारीला सायंकाळी पथक अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत असताना एमआयएमच्या १५ ते २० नगरसेवकांनी समर्थकांसह घटनास्थळी येऊन आरडाओरड, शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

विरोधी पक्षनेता अब्दुल समीर साजिद म्हणाले, ‘वाहुळे साहब, जो भी तुम्हारा नाम है, नियम मे रहे के कार्यवाही करो, म्युनिसिपल काॅर्पोरेशन तुम्हारे बाप की जहाँगीर नही है, अगर महानगरपालिका वाले शहागंज मे दादागिरी करेंगे तो उनको शहागंज मे घुसने नहीं दिया जाएगा’, असे म्हणून हातगाडीवाले गोळा करून चिथावणी देऊन शिवीगाळ करून धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याशिवाय मनपा अधिकारी संजय सुरडकर यांना धमकावून शिवीगाळ करीत जबरदस्तीने वाहनात बसवून हाकलून लावले. नगरसेवक सय्यद उसामा अब्दुल कादीर यांनी अतिक्रमण निरीक्षक रवींद्र देसाई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार तपास करीत आहेत.

व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर बदनामी
अतिक्रमण काढण्यास विरोध करतानाच नगरसेवकांनी त्याचे व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले. जबाबदार पदाधिकारी असताना प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करीत महापालिकेच्या अधिकाऱ्याची बदनामी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title : अतिक्रमण हटाने का विरोध करने पर MIM पार्षदों पर मामला दर्ज।

Web Summary : संभाजीनगर के शाहगंज में अतिक्रमण हटाने के अभियान में बाधा डालने पर MIM पार्षदों और रिश्तेदारों पर आरोप लगे। कथित तौर पर अधिकारियों को धमकी दी और विक्रेताओं को उकसाया, जिसके कारण पुलिस में शिकायत दर्ज की गई।

Web Title : MIM corporators booked for obstructing anti-encroachment drive in Sambhajinagar.

Web Summary : MIM corporators and relatives face charges for obstructing an anti-encroachment drive in Shahganj, Sambhajinagar. They allegedly threatened officials and incited vendors, leading to police complaints and investigations.