शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरात ACB सापळा! भर हॉटेलमध्ये १० हजार स्वीकारले अन् ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 15:45 IST

बिल मंजूर केल्याचं 'बक्षीस' मागितलं; १० हजार स्वीकारताना ग्रामसेवक राजोबा काथार रंगेहाथ अटक

छत्रपती संभाजीनगर: पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनाचे बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात 'बक्षीस' म्हणून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रहाळपट्टी तांडा (जटवाडा) येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. टीव्ही सेंटर चौकातील एका हॉटेलमध्ये मंगळवारी हा थरार घडला. राजोबा विठोबा काथार (५०, रा. वसननगर, जाधववाडी) असे अटक करण्यात आलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

नेमके प्रकरण काय?तक्रारदार कंत्राटदाराने रहाळपट्टी येथे ग्रामनिधी योजनेंतर्गत पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल ग्रामसेवक काथार याने मंजूर करून कंत्राटदाराला दिले होते. मात्र, बिल अदा केल्याचे बक्षीस म्हणून काथार याने कंत्राटदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने कंत्राटदाराने एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.

हॉटेलमध्ये रचला सापळाएसीबीने १६ फेब्रुवारी रोजी केलेल्या पडताळणीत लाचेची मागणी सिद्ध झाली होती. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार, मंगळवारी टीव्ही सेंटर येथील एका हॉटेलमध्ये एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ग्रामसेवक काथार तेथे आला आणि पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारले. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला जाळ्यात ओढले.

घराचीही घेतली झडतीया कारवाईनंतर पोलिसांनी ग्रामसेवक काथार याच्या जाधववाडी येथील घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच्याविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शांतीलाल चव्हाण अंमलदार रवींद्र काळे, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण आणि रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक राजू नागलोत करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : ACB Trap in Sambhajinagar: Village Officer Arrested Accepting Bribe

Web Summary : A village officer in Sambhajinagar was caught red-handed by ACB while accepting ₹10,000 bribe at a hotel. He demanded the bribe for approving water supply and waste management bills. The officer, Rajoba Kathar, is now arrested, and his house is being searched.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी