शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

'तिकीट विकले'; छ. संभाजीनगरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, खासदारांच्या कार्यालयात तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 17:00 IST

या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे.

फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर): जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये मोठा स्फोट झाला आहे. तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज दुपारी खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या फुलंब्री येथील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली असून निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे.

नेमका वाद काय?मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पाल जिल्हा परिषद गटात माजी युवक काँग्रेस अध्यक्ष वरुण पाथ्रीकर यांना डावलून शेवटच्या क्षणी ध्न्यनेश्वर जाधव यांना तिकीट देण्यात आले. तसेच बाबरा गटात खामगाव येथील अजिबात सोनवणे यांना आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. निधोना पंचायत समिती गटातील उमेदवारीवरूनही कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप होता.

कार्यालयात गोंधळ अन् लोटालाट दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शेकडो संतप्त कार्यकर्ते खासदारांच्या कार्यालयात जमा झाले. कार्यकर्त्यांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही, तर कार्यालयातील फर्निचर, खुर्च्या आणि टेबलं यांची तोडफोड केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले खासदारांचे बंधू जगन्नाथ काळे आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष संतोष मेटे यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला. कार्यकर्त्यांनी त्यांना अर्धा तास जाण्यापासून रोखून धरले आणि लोटालाट करत जाब विचारला. "पैसे घेऊन तिकीट वाटप केले जात असून काँग्रेस संपवण्याचं काम सुरू आहे," अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पदाधिकाऱ्यांमध्ये घबराट कार्यकर्त्यांचे हे रौद्र रूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून शेजारील कार्यालयात बसलेले विश्वास औताडे यांनी तातडीने तेथून पळ काढला. या घटनेमुळे कार्यकर्त्यांमधील खदखद उघडपणे रस्त्यावर आली आहे. निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असतानाच झालेली ही तोडफोड आणि आरोप काँग्रेस नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरणार असून, याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress workers vandalize office over ticket distribution for elections.

Web Summary : Congress workers in Phulambri vandalized MP Kale's office, alleging unfair ticket distribution before local elections. Accusations of bribery and sidelining loyalists fueled the unrest, exposing internal divisions and potentially harming the party's electoral prospects.
टॅग्स :ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcongressकाँग्रेसKalyan kaleडॉ. कल्याण काळे