शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
4
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
5
"एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
6
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
7
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
8
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
9
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
10
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
11
बुध प्रदोष २०२६: कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा आणि कोणाचा सुरु होणार कठीण काळ?
12
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
13
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
14
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
15
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
16
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
17
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
18
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
19
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
Daily Top 2Weekly Top 5

२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:28 IST

अतुल पाडळे प्रकरणाने हादरले सिल्लोड; घाटनांद्राच्या बियरबारमध्ये पगार मागितल्यावर अतुलचा अमानुष खून

- श्यामकुमार पुरेसिल्लोड: तालुक्यातील घाटनांद्रा येथील संस्कार बियरबार मध्ये २२ महिन्यापासून स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या तरुणाने भावाच्या लग्नासाठी पैसे लागत असल्याने २ लाख ८६ हजार रुपयांचा थकीत पगार मागितला. मात्र, बियरबारच्या मालक आणि मॅनेजरने पैसे न देता गुप्तांग ठेचून लाठ्याकाठ्याणी बेदम मारहाण करून स्वयंपाकी तरुणाचा खून केला. अतूल प्रल्हाद पाडळे ( २१, रा.वाकडी ता. भोकरदन जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.  याप्रकरणी मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन ४ एप्रिल रोजी मध्यरात्री ११ वाजता अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा, बेदम मारहाण करून खून केल्या प्रकरणी बियरबारच्या मालक आणि मॅनेजर या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरची परिस्थिती बेताची असल्याने अतुल पाडळे हा घाटनांद्रा येथील हॉटेल संस्कार बियरबारमध्ये स्वयंपाकी म्हणून २०२३ पासून १३ हजार रुपये महिन्याप्रमाणे काम करत होता. भावाच्या लग्नासाठी पैसे लागणार आहेत. त्यामुळे महिन्याचा पगार न घेता एकदम सर्व रक्कम द्यावी, असे अतुल याने बियरबार मालक मनीष जयस्वाल याच्यासोबत ठरवले. दरम्यान, गुडीपाडव्याला अतुल घरी वाकडी येथे गेला असता त्याला आई अलकाबाईने आता भावाच्या लग्नासाठी पैसे लागतील असे सांगितले. त्यामुळे हॉटेलवर परत येताच ३० एप्रिल रोजी अतुलने हॉटेल मालकाकडे ठरल्याप्रमाणे एकत्रित पगार देण्याची मागणी केली. मात्र, मालक मनिष जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी ( दोघे रा. घाटनांद्रा ता.सिल्लोड ) यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरून वाद झाल्याने दोघांनी अतुलला लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. डोळा फोडून, गुप्तांग ठेचून अतुलचा हॉटेल मालक व मॅनेजरने निर्घृणपणे खून केला. 

आकस्मिक मृत्यू झाल्याचे नातेवाइकांना सांगितलेदरम्यान, माहिती मिळताच आई अलकाबाई व वडील प्रल्हाद व भाऊ मंगेश घटनास्थळी आले. असता हॉटेल मालकाने त्याचा अकस्मित मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर अतुलला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू बेदम मारहाण करून गुप्तांग ठेचल्याने झाल्याचे उघडकीस आले. अतुलच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात ३० एप्रिल रोजी वाकडी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर ४ मे रोजी रात्री अतुलचे वडील प्रल्हाद यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा आणि इतर कलमांच्या खाली मालक मनिष जयस्वाल व मॅनेजर दिनेश परदेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपींना आज, सोमवारी दुपारी २ वाजता पोलिसांनी अटक केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिनेश कोल्हे, फौजदार लहू घोडे करत आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी