शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
2
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
3
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
4
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
5
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
7
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
8
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
9
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
10
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
11
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
12
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
13
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
14
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
15
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
16
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
17
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
18
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
19
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
20
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 

भरपावसातला थरार; चिखलात पाठलाग करत पोलिसांनी तरुणाकडून गावठी कट्ट्यासह काडतुसे पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 5:12 PM

Crime News In Aurangabad : हर्सूल परिसरातील पिसादेवीरोडवरील आईसाहेब चौकात दोनजण आपसात भांडण करीत होते. त्यातील एक जणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती.

ठळक मुद्देगावठी कट्टे विकणारे रॅकेट उघडकीस होण्याची शक्यता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

औरंगाबाद : गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे घेऊन आलेल्याची माहिती समजताच हर्सूल पोलिसांच्या पथकाने आरोपीला पकडण्यासाठी धाव घेतली. पोलिसांची गाडी आल्याचे दिसताच आरोपीने पावसात धूम ठोकण्यास सुरुवात केली. रस्त्यावर चिखल आणि वरून पडणाऱ्या पावसातही पोलिसांनी सदरील आरोपीला शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान हर्सूल परिसरातील पिसादेवीरोडवर घडली. ( Chase in Rain : the police seized cartridges from the youth along with a Gavathi katta in Aurangabad)

हर्सूल परिसरातील पिसादेवीरोडवरील आईसाहेब चौकात दोनजण आपसात भांडण करीत होते. त्यातील एक जणाकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे यांच्यासह पोलीस कर्मचारी शिवाजी शिंदे, शिवाजी दांडगे, श्रवण गुंजाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आईसाहेब चौकात पोलिसांनी गाडी येत असल्याचा आवाज येताच जवळ पिस्तूल असलेला आरोपी हर्सूलच्या दिशेने पळून जाऊ लागला. पोलिसांच्या पथकानेही त्याच्या पाठीमागे हर्सूलच्या दिशेने धाव घेतली. हा पाठशिवणीचा खेळ अर्धा किलाेमीटरपर्यंत सुरू होता. अखेर उपनिरीक्षक खिल्लारे यांच्यासह दोन पाेलिसांनी शिताफीने पकडले.

तो झटापट करून पळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पोलिसांनी पकडून ठेवले. त्याचवेळी त्याच्याजवळ असलेल्या बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीस नाव विचारले असता, त्याने रामचंद्र रमेश जायभाये (३२, रा. कुंभेफळ, ता. बुलढाणा) असे नाव सांगितले. बॅगमध्ये असलेली गावठी कट्टा व जिवंत काळडुसे व्यवस्थितपणे हाताळत पोलिसांनी ताब्यात घेऊन आरोपीला हर्सूल पोलीस ठाण्यात आणले. ही कामगिरी पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे, पोलीस कर्मचारी राठोड, दांडगे, शिंदे, तांदळे यांच्या पथकाने केली.

आरोपीस पोलीस कोठडीहर्सूल पोलिसांनी आरोपी रामचंद्र जायभाये यास गुरुवारी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीने पोलिसांच्या चौकशीमध्ये कोणतीही माहिती दिलेली नाही. पकडलेला गावठी कट्टा, जिवंत काडतुसे कोणासाठी आणली होती. कोठून आणली होती. याविषयी पोलीस अधिक माहिती गोळा करीत आहेत. त्यातून गावठी कट्टे विकणारे रॅकेट उघडकीस होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस